चित्रकला व निबंध स्पर्धेतील ३५ शाळेतील विजेत्यांचा शिक्षक शिक्षकेत्तर महासंघाच्या वतीने सन्मान

स्पर्धेतील बक्षिसपात्र ३५ शाळांमधील विजेत्या उमेदवारांना बक्षिस देवून संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांची उपस्थिती पाहायाला मिळाली. 

चित्रकला व निबंध स्पर्धेतील ३५ शाळेतील विजेत्यांचा शिक्षक शिक्षकेत्तर महासंघाच्या वतीने सन्मान

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक शिक्षकेत्तर महासंघाच्या (Private Teachers' Non-Teaching Federations) वतीने पुण्यातील गुजराथी हायस्कूल सभागृहात चित्रकला व निबंध स्पर्धा (Painting and Essay Competition) घेण्यात आल्या. स्पर्धेत शहरातील बहुतांश शाळांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील बक्षिसपात्र ३५ शाळांमधील (35 schools awarded in the competition) विजेत्या उमेदवारांना बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांची उपस्थिती पाहायाला मिळाली. 

चित्रकला स्पर्धा निकाल


निकाल अ गट : मध्ये  रँग्लर र. पू. परांजपे प्राथमिक शाळेतील अवनी अमोल जाधव हीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक हुजूरपागा प्राथमिक शाळेतील आकांक्षा निलेश सन्नके, तर तृतीय क्रमांक विश्वकर्मा विद्यालयातील ओंकार रामचंद्र पिलाणी हिने पटकावला. 

उत्तेजनार्थ  : समर्थ विद्यामंदिर येथील आदर्श समाधान लोंढे, साने गुरुजी प्राथमिक शाळेची  तमन्ना नन्हेलाल सरोज,  सरिता विद्यालय येथिल रिद्धी दत्ता मराठे, कै. द मू आंबेकर विद्यालयाचा मोहित नाना सरकटे, शारदा प्राथमिक विद्यालयाचा उदय राहुल देशमुख 

गट ब : मध्ये अभिनव विद्यालय प्राथमिक शाळेतील आराध्या सोमनाथ लांडे हिने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय ऋणल सरदार मगदूम आदर्श विद्यालय मराठी शाळा, तृतीय भाग्यश्री पांडुरंग केंगले समर्थ विद्यामंदिर प्राथमिक शाळा.  

उत्तेजनार्थ : आरुष रवींद्र गायकवाड पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक विद्यालय, संघर्ष जगन्नाथ गायकवाड आदर्श प्राथमिक विद्यालय दळवी नगर, आरोही सचिन धुमाळ विद्या विकास विद्यालय, नीलम मानप्पा सपोनिशी शिशुविहार प्राथमिक शाळा एरंडवणा, श्रुती शंकर मराठे शिवछत्रपती प्राथमिक विद्यालय. 

गट क : प्रथम क्रमांक आयुष सचिन चोंधे अभिनव विद्यालय, द्वितीय क्रमांक स्वरा प्रकाश शिर्के विश्वकर्मा विद्यालय, तृतीय क्रमांक अनुष्का अविनाश धनवे वनाझ परिवार विद्यामंदिर 

निबंध स्पर्धा निकाल

विद्यार्थी गट : प्रथम स्नेहल संदीप माळी नवमहाराष्ट्र प्रायमरी स्कूल, द्वितीय - गुजर उर्वी परेश नवमहाराष्ट्र प्रायमरी स्कूल, तृतीय - समृद्धी संदीप कदम नवमहाराष्ट्र प्रायमरी स्कूल

शिक्षक निबंध स्पर्धा निकाल : प्रथम सुनिता नामदेव पाटील विश्वकर्मा विद्यालय, द्वितीय मीनाक्षी मेमाणे- पाटील प्रतिभा पवार विद्या मंदिर,  समान गुण असल्याने तृतीय सुनिता पवार विमलाबाई लुंकड विद्यालय गुलटेकडी यांनी पटकावला

पालक निबंध स्पर्धा निकाल : प्रथम -प्रिया श्रीकृष्ण विखे माधव सदाशिव गोडवळकर गुरुजी विद्यालय, द्वितीय - प्रीती गजानन भोज अभिनव प्राथमिक विद्यालय, तृतीय - भक्ती ब्रम्हानंद साबळे विश्वकर्मा इंग्लिश मीडियम स्कूल