ओबीसी व ईडब्ल्युएस प्रवर्गातील मुलींचे शैक्षणिक शुल्क शासन भरणार

मागील तीन वर्षात प्रलंबित राहिलेल्या शुल्क प्रतिपूर्तीची शंभर टक्के परतफेड करण्यासाठी येत्या अधिवेशनात तरतूद करण्यात येणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. 

ओबीसी व ईडब्ल्युएस प्रवर्गातील मुलींचे शैक्षणिक शुल्क शासन भरणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इतर मागास वर्ग (OBC) तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (EWS) आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची शंभर टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती (Fee Reimbursement) शासनामार्फत करण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव मराठा आरक्षण (Maratha Reservation) व इतर सोयीसुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. हा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येऊन मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले.

 

मागील तीन वर्षात प्रलंबित राहिलेल्या शुल्क प्रतिपूर्तीची शंभर टक्के परतफेड करण्यासाठी येत्या अधिवेशनात तरतूद करण्यात येणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास मंत्री  गिरीश महाजन, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संचालक नरेंद्र पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते तसेच, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, उमाकांत दांगट मधुकरराव कोकाटे, डॉ. नवनाथ पासलकर आदी उपस्थित होते.

विद्यार्थी सलग सहा दिवस गैरहजर राहिल्यास शिक्षक थेट घरी जाणार

 

सारथीच्या पीएचडी फेलोशिपसाठीच्या सीईटी

 बैठकीत मंत्री पाटील यांनी सारथीच्या पीएच.डी फेलोशिपसाठीच्या विद्यार्थ्यांची सीईटी परिक्षा तातडीने घेण्याचे सूचित केले. यामध्ये पात्र झालेल्या विद्यार्थांना गुणवत्ता यादीनुसार फेलोशिप देण्याची प्रक्रिया राबवण्याचे सूचित केले.

 

सारथी संस्थेच्या योजना अमंलबजावणीचा आढावा घेऊन पाटील यांनी मराठा समाजातील तरुण तरुणींना उच्च शिक्षण, स्पर्धा परिक्षा यासह शेतकरी वर्गासाठीच्या सर्व योजनांची प्रवेश प्रक्रिया तसेच प्रशिक्षण संस्था यांची निवड प्रक्रीया पारदर्शकपणे करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना दिल्या.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO