अंगणवाडी सेविकांची घोर निराशा ; मानधनात तुटपुंजी वाढ

अंगणवाडी सेविकांचे मानधन ८ हजार ३२५ रुपयांवरुन १० हजार तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५ हजार ९७५ वरुन ७ हजार २०० आणि मदतनीसांचे मानधन ४ हजार ४२५ रुपयांवरुन ५ हजार ५०० रुपये केल्याची घोषणा करण्यात आली.

अंगणवाडी सेविकांची घोर निराशा ; मानधनात तुटपुंजी वाढ

पुणे : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात केवळ दिड हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना आली. त्यामुळे शासनाने तुटपुंजी मानधन वाढ करून अंगणवाडी सेविका व मदतनीसांची बोळवण करण्याची भावना अंगणवाडी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.

   मानधन व मुळ वेतनात भरघोस वाढ व्हावी, या मागणीसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी आंदोलन पुकारले होते. राज्य आश्‍वासन दिल्यानंतर संघटनांनी आंदोलन स्थगित केले होते. राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद होईल अशी अपेक्षा होती.परंतु,

 अंगणवाडी सेविकांचे मानधन ८ हजार ३२५ रुपयांवरुन १० हजार तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५ हजार ९७५ वरुन ७ हजार २०० आणि मदतनीसांचे मानधन ४ हजार ४२५ रुपयांवरुन ५ हजार ५०० रुपये केल्याची घोषणा करण्यात आली. मानधनात केवळ २० टक्के वाढ केल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यात असंतोषाची भावना आहे.