धक्कादायक : दहशतवादी कृत्यांसाठी पुण्यातील शाळेचा वापर, दोन मजले जप्त

राष्ट्रीय तपास यंत्रणेने ब्लु बेल्स शाळेच्या इमारतीतील चौथा आणि पाचवा मजला जप्त केला आहे. दहशतवादी कृत्यांची तयारी याठिकाणी केली जात होती.

धक्कादायक : दहशतवादी कृत्यांसाठी पुण्यातील शाळेचा वापर, दोन मजले जप्त
NIA seizes 2 floors of a school in Pune

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पुण्यातील एका शाळेचे दोन मजले जप्त केले आहेत. या शाळेचा वापर दहशतवादी कृत्यांसाठी केला जात असल्याचे एनआयएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून (PFI) त्याचा वापर मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनविण्यासाठी केला जात होता. त्यानंतर त्या तरूणांना विशिष्ट समाजातील नेते व संस्थांवर हल्ले तसेच हत्या करण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. (NIA seizes 2 floors of a school in Pune used by PFI as camps for radicalisation)

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेने ब्लु  बेल्स  शाळेच्या इमारतीतील चौथा आणि पाचवा मजला जप्त केला आहे. दहशतवादी कृत्यांची तयारी याठिकाणी केली जात होती. पीएफआयकडून मुस्लिम तरूणांना आपल्या जाळ्यात ओढून भारतात २०४७ अखेरपर्यंत इस्लामिक राजवट स्थापन करण्यास विरोध करणाऱ्यांना संपविण्यासाठी किंवा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी प्रशिक्षित केले जात होते. तरुणांना चाकूसह इतर धोकादायक शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले, असा दावा एनआयएने केला आहे.

एनआयएने मागील वर्षी २२ सप्टेंबर महिन्यात शाळेच्या इमारतीतील या दोन मजल्यांची झडती घेतली होती. या मजल्यांवरील खोल्यांमध्ये केलेल्या तपासांत हाती आलेल्या दस्तऐवजांनुसार जागेचा वापर केडरसाठी शस्त्र प्रशिक्षण देण्यासाठी केल्याचे आढळून आले आहे. दशतवादी कृत्यांसाठी या तरुणांना प्रवृत्त केला जात होते. सरकार तसेच विशिष्ट समाजाचे नेते व संस्थांविरोधात त्यांना भडकवले जात होते, असे तपास संस्थेकडुन स्पष्ट करण्यात आले आहे.