JEE Main 2024 : आता जेईई मुख्य परीक्षेसाठी अबुधाबीतही केंद्र

संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील दुबई आणि शारजा शहरे आधीच परीक्षा केंद्रांच्या यादीमध्ये समाविष्ट आहेत. इच्छुक उमेदवार ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

JEE Main 2024 : आता जेईई मुख्य परीक्षेसाठी अबुधाबीतही केंद्र
JEE Main 2024

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अबुधाबी (Abu Dhabi) हे आता जेईई मुख्य परीक्षा २०२४ (JEE Main 2024) साठी नवीन परीक्षा केंद्र असेल, अशी अधिसूचना नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जारी केली आहे. अबुधाबीमधील भारतीय राजदूताच्या मागणीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वरिष्ठ संचालक (परीक्षा) डॉ. साधना पराशर यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

 

अबुधाबीमधील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना जेईई मुख्य २०२४ च्या परीक्षेला बसले आहेत, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. तर संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील दुबई आणि शारजा शहरे आधीच परीक्षा केंद्रांच्या यादीमध्ये समाविष्ट आहेत. इच्छुक उमेदवार ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

राज्यसेवा मुख्य परीक्षेचे लातूर व कोल्हापूर केंद्र रद्द

 

ऑफलाइन अर्ज भरण्याचा पर्याय नसेल, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी आधीच अर्ज भरला आहे त्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची संधी दिली जाईल, असे एजन्सी कडून सांगण्यात आले आहे. पहिल्या सत्राची परीक्षा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घेतली जाईल. १२ फेब्रुवारीला NTA च्या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केले जातील.

 

उमेदवाराला एका सत्रासाठी किंवा दोन्ही सत्रांसाठी अर्ज केल्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याचा पर्याय असेल. इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू अशा १३ भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO