ICMAI CMA निकाल जाहीर; असा पाहता येणार निकाल
ICMAI CMA ची जून सत्राची परीक्षा १५ ते २२ जुलै दरम्यान घेण्यात आली. CMA फायनल आणि ICMAI CMA इंटर परीक्षेत प्रत्येकी १०० गुणांच्या चार पेपर्सचे दोन सेट होते.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकौटंटस ऑफ इंडिया (ICMAI) ने प्रमाणित व्यवस्थापन लेखापाल (CMA) इंटर आणि अंतिम निकाल २०२३ जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट icmai.in वर त्यांचे निकाल पाहू आणि डाउनलोड करू शकतात.
ICMAI CMA ची जून सत्राची परीक्षा १५ ते २२ जुलै दरम्यान घेण्यात आली. CMA फायनल आणि ICMAI CMA इंटर परीक्षेत प्रत्येकी १०० गुणांच्या चार पेपर्सचे दोन सेट होते. CMA इंटरमिजिएट आणि फायनल जुलै २०२३ परीक्षेत पात्र होण्यासाठी, उमेदवारांनी किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. तर जून सत्रासाठी CMA इंटर आणि CMA अंतिम परीक्षेत बसलेल्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान ४० टक्के गुण प्राप्त करावे लागतील.
शिक्षक माघार घेईनात! साक्षरता अभियानावरील बहिष्कार कायम, तोडगा नाहीच
CMA निकाल कसा तपासायचा -
* सर्वप्रथम icmai.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
* परीक्षा टॅबवर क्लिक करा.
* आता होमपेजवरून 'icmai result' पर्याय निवडा.
* तुम्ही दिलेल्या परीक्षेवर क्लिक करा.
* ११ अंकी CMA नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा आणि 'निकाल पहा' वर क्लिक करा.
* ICAMAI CMA निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
* निकाल डाउनलोड करू प्रिंटआउट घ्या.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.