राज्यसेवा मुख्य परीक्षेचे लातूर व कोल्हापूर केंद्र रद्द

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मुलाखतींसाठी नवी मुंबई, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर व नागपूर ही केंद्र निश्चित केली होती.

राज्यसेवा मुख्य परीक्षेचे लातूर व कोल्हापूर केंद्र रद्द
MPSC

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या (State Service Mains Exam) मुलाखतीचा कार्यक्रम दि. १० नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार परीक्षेच्या मुलाखती (MPSC Interview) दि. ३० नोव्हेंबर ते १२ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मात्र, या परीक्षेसाठीचे नियोजित लातूर (Latur) व कोल्हापूर (Kolhapur) ही केंद्र आयोगाकडून रद्द करण्यात आली आहेत.

 

आयोगाकडून मुलाखतींसाठी नवी मुंबई, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर व नागपूर ही केंद्र निश्चित केली होती. मात्र, काही प्रशासकीय कारणास्तवर आयोगाकडून लातूर व कोल्हापूर ही केंद्रे रद्द करण्यात आली आहेत.

 

या केंद्रावरील उमेदवारांच्या मुलाखती नियोजित दिनांकास आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात घेण्यात येणार आहेत. उमेदवारांना लवकरच मुलाखत पत्रे पाठविण्यात येणार आहेत. त्यात मुलाखतीचे ठिकाण, दिनांक, वेळ अन्य माहिती, सुचना आदी बाबींचा समावेश असेल, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO