पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी नवीन मतदार यादी तयार होणार

भारत निवडणूक आयोगाकडून याबाबत राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाकडून मतदारयाद्यांबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी नवीन मतदार यादी तयार होणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील मुंबई (Mumbai) व कोकण (Kokan) पदवीधर तसेच मुंबई (Mumbai) व नाशिक (Nashik) विभाग शिक्षक विधानपरिषद मतदारसंघांमध्ये २०२४ मध्ये होणाऱ्या द्विवार्षिक निवडणूकींसाठी (Election) पुर्णत: नवीन मतदार यादी तयार केली जाणार आहे. ही मोहिम दि. ३० सप्टेंबरपासून सुरू होणार असून दि. ६ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर दि. ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदारयाद्या प्रसिध्द करण्यात येतील .

 

भारत निवडणूक आयोगाकडून याबाबत राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाकडून मतदारयाद्यांबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यानुसार पदवीधर मतदार नोंदणीसाठी नमुना १८ व शिक्षक मतदार नोंदणीसाठी नमुना १९ भरून घेतले जाणार आहेत. त्यानंतर दि. २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्यानंतर या निवडणुकींसाठी नवीन अंतिम मतदार याद्या ३० डिसेंबर रोजी प्रसिध्द केल्या जातील.

वारे गुरुजी ढसाढसा रडले ; प्रकाश महाजनांनी धुतले गुरुजींचे पाय

 

द्विवार्षिक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी, मुंबई व कोकण विबागातील पात्र पदवीधर व्यक्तींनी तसेच मुंबई व नाशिक विभागातील पात्र शिक्षकांनी त्या संबंधित विभागामध्ये मतदार म्हणून मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी करावी यासाठी मोहिम राबविली जाणार आहे. मतदार नोंदणीसाठी नमुमा १८ व १९ https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील. तसेच उपविभागीय आयुक्त किंवा तहसीलदार यांच्याकडेही उपलब्ध असतील. त्याच कार्यालयात अर्ज भरून देता येतील.

 

मतदार नोंदणीसाठी एकत्रित स्वरुपात अर्ज प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे स्वीकारण्यात येणार नाही. मात्र, संस्था प्रमुख त्यांच्या संस्थेतील पात्र शिक्षक किंवा पदवीधर कर्मचाऱ्यांचे अर्ज एकत्रितरीत्या सादर करू शकतात, असे परिपत्रक स्पष्ट करण्यात आले आहे. राजकीय पक्ष, मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधी किंवा रहिवाशी कल्याणकारी संघटना यांच्यामार्फत एकत्रित स्वरुपात अर्ज प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j