Teachers Recruitment : २०१९ मधील 'त्या' उमेदवारांची रिक्त जागांवर शिफारस, वादानंतर शिक्षण विभागाची तत्परता

२०१९ मधील शिक्षक पदभरतीच्या वेळी अपात्र, गैरहजर, रुजू न होणे इत्यादी कारणांमुळे रिक्त राहिलेल्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले होते.

Teachers Recruitment : २०१९ मधील 'त्या' उमेदवारांची रिक्त जागांवर शिफारस,  वादानंतर शिक्षण विभागाची तत्परता
Teachers Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यात २०१९ मधील शिक्षक पदभरतीच्या (Teachers Recruitment) वेळी अपात्र, गैरहजर, रुजू न होणे इत्यादी कारणांमुळे रिक्त राहिलेल्या जागांसाठी उमेदवारांच्या निवडीची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित उमेदवारांनी व्यवस्थापनाकडे पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाकडून (School Education Department) करण्यात आले आहे. दरम्यान, एक महिला शिक्षक उमेदवार आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यातील संवाद व्हायरल झाल्यानंतर भरतीबाबत मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर दोन दिवसांतच शिक्षण विभागाने ही प्रक्रिया सुरू केली आहे. (Maharashtra Government)

 

शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०१७ नुसार पवित्र पोर्टलमार्फत यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांकरिता  मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थातील मुलाखतीसह पद भरतीसाठीची कार्यवाही करण्यात आलेली आहे.

शिक्षक भरती जाहिरातीसाठी अजून १० ते १५ दिवसांची प्रतिक्षा?

 

२०१९ मधील शिक्षक पदभरतीच्या वेळी अपात्र, गैरहजर, रुजू न होणे इत्यादी कारणांमुळे रिक्त राहिलेल्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले होते. स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारांतर्गत गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

 

पुणे महानगर पालिका माध्यमिक विभाग २ पदे व बृहन्मुंबई महानगरपालिका प्राथमिक विभाग - ६ पदे (इ. ६ वी ते इ ८ वी गटातील इंग्रजी माध्यमाची इंग्रजी भाषा विषयाची) यासाठी संबंधित व्यवस्थापनाने कळविल्यानुसार पदभरतीसाठी  शिफारस करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या पदांसाठी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदभरतीसाठी शिफारस झालेली नाही.

राज्यातील तीन हजार अंगणवाडी सेविकांना लवकरच पदोन्नती

 

अशी पाहता येणार निवड

पात्र उमेदवारांनी लॉगीन केल्यानंतर Applicant Recommended status वर क्लिक केल्यावर View Recommended Institute list मध्ये आपली निवडीसाठी शिफारस झाली असल्यास संबंधित व्यवस्थापनाचे नाव व शिफारस झालेले  पद दिसेल. View Preferencewise status यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्यातील शिफारस झालेला प्राधान्यक्रम दिसेल. त्यानुसार आपण शिफारस झालेल्या व्यवस्थापनाकडे पुढील कार्यवाहीसाठी संपर्क  साधावा.

 

अशी होईल निवडीची प्रक्रिया

उमेदवाराच्या निवडीसाठी रिक्त पदांच्या जाहिरातीतील त्याच्या प्रवर्गाचे/ खुल्या प्रवर्गाचे (समांतर आरक्षण) गुण व जाहिरातीच्या संबंधित गटातील विषयाचे गुण Cutoff गुणापेक्षा अधिक गुण आवश्यक आहेत. मूळ रिक्त पदांच्या यादीतील उमेदवारांच्या शिफारस यादीनंतर शिल्लक राहिलेल्या माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या पदापैकी १० टक्के पदे माजी सैनिक या समांतर आरक्षणात ठेऊन उर्वरित पदे त्या त्या प्रवर्गाच्या प्युअरमध्ये (समांतर  आरक्षणाव्यतिरिक्त) वर्ग करून पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करण्याची कार्यवाही करण्यात येईल. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्राची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती करेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

अडचणी आल्यास येथे साधा संपर्क : edupavitra@gmail.com

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO