अखेर डॉ. विनायक काळे यांच्या नावाचा आदेश निघाला;  ‘बी.जे.’ महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती

डॉ. विनायक काळे यांची प्रशासकीय कारण देत दि. १३ जानेवारी रोजी अधिष्ठाता पदावरून बदली करण्यात आली होती. त्यांच्यावर महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

अखेर डॉ. विनायक काळे यांच्या नावाचा आदेश निघाला;  ‘बी.जे.’ महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती
Dr. Sanjeev Thakur and Dr. Vinayak Kale

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) आदेशामुळे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे (BJ Medical College) तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर (Dr. Sanjeev Thakur) यांना पद सोडावे लागले होते. तसेच ड्रग्ज प्रकरणातही (Lalit Patil Drugs Case) त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून पदमुक्त करण्यात आले आहे. त्याला वीस दिवस उलटल्यानंतर राज्य सरकारने डॉ. विनायक काळे (Dr. Vinayak Kale) यांच्या नियुक्तीचा आदेश काढला आहे.

 

डॉ. विनायक काळे यांची प्रशासकीय कारण देत दि. १३ जानेवारी रोजी अधिष्ठाता पदावरून बदली करण्यात आली होती. त्यांच्यावर महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. अधिष्ठातापदी डॉ. संजीव ठाकूर यांच्या नियुक्तीविरोधात डॉ. काळे यांनी सुरूवातीला मॅटमध्ये याचिका दाखल केली होती. तिथे त्यांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर डॉ. ठाकूर यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. पण तिथेही डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल लागला.

सेट परीक्षेची तारीख ठरली ; ७ एप्रिलला होणार परीक्षा

 

न्यायालयाच्या निकालामुळे डॉ. ठाकूर यांना पद सोडावे लागणार होते. त्याचदिवशी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळे डॉ. ठाकूर यांना पदमुक्त केल्या आदेश निघाला. त्यामुळे डॉ. काळे हे महाविद्यालयात पदभार स्वीकारण्यासाठी आले होते. पण वैद्यकीय शिक्षण विभागातून अधिकृत आदेश नसल्याने त्यांना पदभार स्वीकारता आला नाही. सध्या एका सेवाजेष्ठ प्राध्यापकांकडे अधिष्ठाता पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. अखेर बुधवारी डॉ. काळे यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला.

 

डॉ. काळे यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा तात्पुरता पदभार सोपविण्यात येत असल्याचे राज्य सरकारच्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, सध्या कोणत्याही पदावर नसलेल्या डॉ. संजीव ठाकूर यांच्या निुक्तीबाबतचे आदेश यथावकाश काढण्यात येतील, असेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. ललित पाटील प्रकरणात त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO