राज्यातील तीन हजार अंगणवाडी सेविकांना लवकरच पदोन्नती

अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन घेण्यासाठी ११ हजार ८०० रूपये आणि अंगणवाडी सेविकांसाठीच्या प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा प्रीमिअर शासन भरणार असल्याचे तटकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले.

राज्यातील तीन हजार अंगणवाडी सेविकांना लवकरच पदोन्नती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी (Anganwadi Sevika) खुशखबर आहे. जवळपास तीन हजार सेविकांना लवकरच पदोन्नती मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Women and Child Devlopment Minister Aditi Tatkare) यांनी दिली आहे. सेविकांना सेवानिवृत्तीविषयक ही बाब धोरणात्मक असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मंत्रालयात अंगणवाडी कर्मचारी यांच्या विविध मागण्यांबाबत कृती समितीच्या बैठकीत महिला तटकरे बोलत होत्या. यावेळी आमदार कपिल पाटील, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बालविकास  आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, यासह अंगणवाडी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

सिंहगड इन्स्टिट्यूटचे मारुती नवले यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

 

अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन घेण्यासाठी ११ हजार ८०० रूपये आणि अंगणवाडी सेविकांसाठीच्या प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा प्रीमिअर शासन भरणार असल्याचे तटकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले. तसेच तीन हजार  अंगणवाडी सेविकांना लवकरच पदोन्नतीही मिळणार आहे. मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करणे याबाबतीत निर्णय घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीविषयक ही बाब धोरणात्मक असून त्याबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर हा विषय सादर करण्यात येईल. अंगणवाडी सेविकांना दरमहा पाच तारखेच्या आत मानधन मिळावे आणि इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. अशी माहिती मंत्री तटकरे यांनी दिली.

 

बालधोरणाची माहिती लवकरच संकेतस्थळावर

राज्यातील प्रत्येक बालकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वसमावेशक असे ‘बालधोरण’ तयार केले जात आहे. जनतेच्या हरकती आणि सूचना मागविण्यासाठी विभागाने बालधोरणाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशा सूचना तटकरे यांनी दिल्या आहेत. बालधोरण मसुद्याचे सादरीकरण मंत्रालयात झाले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO