विद्यापीठ आयोगाकडून क्रेडिट फ्रेमवर्कवर शिक्कामोर्तब

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP 2020) शिफारशींवर आधारित हे फ्रेमवर्क तयार करण्यात आले आहे. नव्या धोरणामध्ये नियमित शिक्षणाला व्यावसायिक शिक्षणाची जोड देत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे अनेक पर्याय खुले करून देण्यात आले आहेत.

विद्यापीठ आयोगाकडून क्रेडिट फ्रेमवर्कवर शिक्कामोर्तब
National Credit Framework

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) ने शालेय शिक्षण ते उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रमांसाठी नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कचा (National Credit Framework) अंतिम अहवाल प्रसिध्द करण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP 2020) शिफारशींवर आधारित हे फ्रेमवर्क तयार करण्यात आले आहे. नव्या धोरणामध्ये नियमित शिक्षणाला व्यावसायिक शिक्षणाची जोड देत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे अनेक पर्याय खुले करून देण्यात आले आहेत.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/   

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने फ्रेमवर्क तयार करण्यासाठी एक उच्च स्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल युजीसीकडून सोमवारी प्रसिध्द करण्यात आला. युजीसीसह भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अन्ड ट्रेनिंग (NCEVT), नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अन्ड ट्रेनिंग (NCERT), शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण व सारक्षरता विभाग आणि उच्च शिक्षण विभाग, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE), केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग (NIOS) आणि प्रशिक्षण महासंचालनालय (DGT) या संस्थांमधील सदस्यांचा समितीमध्ये समावेश होता.

हेही वाचा : केवळ ९४ हजार विद्यार्थ्यांचे ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशन; निधीअभावी तेही रखडले

नवीन फ्रेमवर्कनुसार विद्यार्थ्यांना चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असताना इतर विषयांचे प्रमाणपत्र, पदविका किंवा पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. त्याचे क्रेडिट्स विद्यार्थ्यांना दिले जातील. चार वर्षात प्रत्येक वर्ष पूर्ण झाल्यानंतर कधीही प्रवेश घेण्याचा आणि बाहेर पडण्याचे पर्यायही उपलब्ध असते. नियमित शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणही घेता यावे, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे.

शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि व्यावसायिक व तंत्र शिक्षणाला एकाच छताखाली आणण्याच्यादृष्टीने हे फ्रेमवर्क तयार करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना त्या-त्या स्तरावर प्राप्त झालेल्या क्रेडिटचा उपयोग पुढील स्तरावरील अभ्यासक्रमासाठीही होणार आहे. हे क्रेडिटचा वापर करून विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतात किंवा अभ्यासक्रम थांबवून इतर अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. या लवचिकतेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या अनुषंगाने कोणत्याही टप्प्यावर शिक्षणात खंड न पडता निर्णय घेता येणार आहे.