SPPU News : बांबूपासून बनविलेल्या राख्या पाहिल्या का? राख्यांना दिली महिलांची नावे, विद्यापीठात मिळणार प्रशिक्षण

राखी महोत्सवानिमित्त कौशल्य विकास केंद्राच्या डॉ. पूजा मोरे यांच्यामार्फत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना राखी बांधण्यात आली.

SPPU News : बांबूपासून बनविलेल्या राख्या पाहिल्या का? राख्यांना दिली महिलांची नावे, विद्यापीठात मिळणार प्रशिक्षण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) बांबूपासून तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी (Dr. Suresh Gosavi) यांच्या हस्ते मार्बल सभागृहात झाले. विद्यापीठात कौशल्य विकास केंद्राच्या हस्तकला आणि कला केंद्र व मेळघाट सपोर्ट ग्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. (Savitribai Phule pune University News)

राखी महोत्सवानिमित्त कौशल्य विकास केंद्राच्या डॉ. पूजा मोरे यांच्यामार्फत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना राखी बांधण्यात आली. याप्रसंगी कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. राधाकृष्ण पंडित, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर,परीक्षा व मूल्यमापनमंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे, वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके तसेच सर्व व्यवस्थापन परिषद सदस्य आदी उपस्थित होते.

...हे अतिशय गंभीर! पराग काळकर यांच्या नियुक्तीवर विजय वडेट्टीवार यांचा आक्षेप

विद्यापीठात हस्तकला आणि कला युनिट मध्ये सृष्टीबंध बांबू राखी महोत्सव दि. ३० ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. मेळघाटातील कोरकु आदिवासी समाजातील महिला निर्मित पर्यावरण हितैशी सृष्टीबंध बांबू राख्या या महोत्सवाचे वैशिष्टय आहे. ज्या महिलांनी या राख्या बनविल्या, त्या महिलांचे नाव राख्यांना दिली आहेत, अशी माहिती मेळघाट सपोर्ट ग्रुप चे मिलिंद लिमये यांनी दिली.

बांबूपासून वस्तूंच्या निर्मितीचे प्रशिक्षण

कौशल्य विकास केंद्र आणि मेळघाट सपोर्ट ग्रुप यांच्या सामंजस्य कराराअंतर्गत दोन क्रेडिट कोर्स विद्यापीठात लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यात प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना बांबूच्या कौशल्यावर आधारित वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कौशल्यातून रोजगार निर्मिती होऊन विध्यार्थी स्वावलंबी होऊ शकतो. तसेच तो या प्रशिक्षणाच्या माध्यमातून उद्योग व रोजगार निर्मिती करू शकतो, अशी माहिती डॉ. राधाकृष्ण पंडित यांनी दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo