Teachers Award : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी नाव नोंदणीची मुदत पुन्हा वाढवली

जिल्हा व विभागीय स्तरावरील शिक्षकांच्या अर्जांची तपासणी  २५ जुलैपर्यंत पूर्ण करून शिक्षकांची यादी राज्यस्तरीय समितीकडे पाठवली जाणार होती.

Teachers Award : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी नाव नोंदणीची मुदत पुन्हा वाढवली
National Awards to Teachers 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने (Education Ministry) शिक्षकांना देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी (National Teachers Award) नोंदणीची अंतिम मुदत वाढवून ७ ऑगस्ट करण्यात आली आहे. इच्छूकांना nationalawardstoteachers.education.gov.in या लिंकवर नाव नोंदणी करता येईल.

नाव नोंदणीसाठी या आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसार  १५ जुलै ही अंतिम मुदत होती. त्यानंतर जिल्हा व विभागीय स्तरावरील शिक्षकांच्या अर्जांची तपासणी  २५ जुलैपर्यंत पूर्ण करून शिक्षकांची यादी राज्यस्तरीय समितीकडे पाठवली जाणार होती. २६ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत राज्यस्तरीय समिती अर्जांची छाननी करून  केंद्राच्या पोर्टलवर शिक्षकांची नावे अपडेट करणार होती. आणि त्यानंतर  ४ आणि ५ ऑगस्ट रोजी शिक्षकांच्या मुलाखती होणार होत्या. पण आता मुदत वाढवल्यामुळे या वेळापत्रकात बदल होऊ शकतो. अद्याप बदललेले वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. 

Vertical University : महाराष्ट्र सरकारकडून निकष जाहीर; जागा, इमारत, सोयीसुविधा, पात्रतेच्या अटी पाहा...

पुरस्कारासाठी इच्छुक असणाऱ्या  शिक्षकांनी त्यांनी  शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे जीवन सुधारण्यासाठी केलेल्या कार्याचे फोटो, ऑडिओ, व्हिडिओ, त्यांचे  सर्व कागदपत्रांसह, क्षेत्र भेटीचा अहवाल, छायाचित्रे अर्जासोबत जोडायचे आहेत.

राष्ट्रीय पुरस्कारासाठी अटी आणि पात्रता - 

* किमान १० वर्षे सेवा करणारे आणि सध्या मान्यताप्राप्त प्राथमिक, मध्यम, उच्च किंवा उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असलेले शाळेचे शिक्षक आणि संस्थांचे प्रमुख पुरस्कारासाठी पात्र असतील. 

* जे शिक्षक यावर्षी सेवानिवृत्त झाले आहेत, परंतु किमान ३० एप्रिल २०२३ पर्यंत सक्रिय कर्तव्यावर होते, त्यांचाही पुरस्कारासाठी विचार केला जाऊ शकतो.

* नोंदणीकृत शिक्षक उमेदवार शिकवणी घेत असतील तर त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.  

* शैक्षणिक प्रशासक, शिक्षण निरीक्षक, प्रशिक्षण संस्थांचे कर्मचारी, कंत्राटी शिक्षक आणि शिक्षक मित्र पुरस्कारासाठी पात्र नसतील. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD