RTE चा अर्ज भरला का ? आतापर्यंत साडेपाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी भरले अर्ज ; केवळ पुण्यातून प्रतिसाद 

राज्यातील बहुतांश जिल्ह्यातून प्रवेश अर्ज भरण्यास थंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.काही जिल्ह्यात बोटावर मोजण्याएवढे अर्ज भरले गेले असून अनेक जिल्ह्यात 50 पेक्षा कमी विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.

 RTE चा अर्ज भरला का ? आतापर्यंत साडेपाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी भरले अर्ज ; केवळ पुण्यातून प्रतिसाद 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला (RTE Online Admission Process)सुरुवात झाली असून बुधवारी दुपारपर्यंत राज्यातील सुमारे 5 हजार 670  विद्यार्थ्यांनी आरटीईचे अर्ज भरले (Students filled RTE applications).त्यात एकट्या पुणे जिल्ह्यातील अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या (Number of students in Pune district who filled the application form)1 हजार 700 हून अधिक आहे.मात्र, राज्यातील बहुतांश जिल्ह्यातून प्रवेश अर्ज भरण्यास थंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.काही जिल्ह्यात बोटावर मोजण्याएवढे अर्ज भरले गेले असून अनेक जिल्ह्यात 50 पेक्षा कमी विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.परंतु,पुढील काही दिवसांत अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल,असे शिक्षण अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के आरक्षित जागांवर ऑनालाईन प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून राज्यातील किती शाळांमधील किती जागांवर प्रवेश दिले जाणार याबाबतची अंतिम आकडेवारी समोर आली आहे.त्यानुसार राज्यातील 76 हजार 36 शाळांमधील 8 लाख 86 हजार 159 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.त्यातील बहुतांश शाळा या शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच आहेत.त्यामुळे किती पालक प्रवेशास पसंती देतात , याबाबतचे चित्र पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे. 16 एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून  पालक https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळाला भेट देऊन येत्या 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकतात.

पालकांना आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरत  असताना केवळ सरकारी व अनुदानित शाळांची यादी समोर येत आहे.त्यामुळे पालकांची घोर निराशा झाली आहे.सरकारी शाळेत प्रवेश घ्यायचा मग आरटीईचा अर्ज कशाला करायचा ? अर्ज न भरता सुध्दा शाळेत थेट प्रवेश मिळतोच ना ? मग एवढा खटाटोप कशासाठी ? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.आपल्या मुलाला सुध्दा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळावी, या उद्देशाने पालक आरटीईतून प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करत होते. 

आरटीई प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हा निहाय आकडेवारी (बुधवार दुपारी 1.25 पर्यंतची आकडेवारी  )
अहमदनगर 217,अकोला 40, अमरावती 112, छत्रपती सांभाजीनगर 315, भंडारा 27,बीड 87, बुलढाणा 43, चंद्रपूर 41, धुळे 42, गडचिरोली 4, गोंदिया 40 , हिंगोली 24 , जळगाव 140, जालना 140,  कोल्हापूर 40, लातूर 66,  मुंबई 220, नागपूर 928, नांदेड 86, नंदुरबार 10, नाशिक 448,धाराशीव 26,  पालघर 19, परभणी 27, पुणे 1746 , रायगड 75,  रत्नागिरी3,  सांगली 35,सातारा47,  सिंधुदुर्ग 0,  सोलापूर 102, ठाणे 422, वर्धा 52, वाशिम 19, यवतमाळ 92