ICAI 2024 : CA इंटर मीडिएट आणि फायनल परीक्षांचे हाॅल तिकीट लवकरच प्रसिद्ध 

येत्या आठवडाभरात कधीही उमेदवारांचे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळ eservices.icai.org वर प्रसिद्ध केले जाईल.

ICAI 2024 : CA इंटर मीडिएट आणि फायनल परीक्षांचे हाॅल तिकीट लवकरच प्रसिद्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) मे महिन्यात चार्टर्ड अकाउंटन्सी (CA) इंटर मीडिएट आणि फायनल परीक्षांचे आयोजित करत आहे. त्यामुळे उमेदवारांना आता दोन्ही परीक्षांच्या प्रवेशपत्रांची प्रतीक्षा आहे. पुढील आठवड्यात कधीही उमेदवारांचे प्रवेशपत्र (Admit card of candidates) अधिकृत संकेतस्थळ eservices.icai.org वर प्रसिद्ध केले जाईल. उमेदवार आपल्या आयडी नंबर आणि पासवर्ड वापरून डाउनलोड करू शकतात. 

ICAI CA पुर्व परीक्षा गट 1 साठी 3, 5 आणि 9 मे रोजी होणार आहे, तर गट 2 च्या परीक्षा 11, 15 आणि 17 मे 2024 रोजी होणार आहेत. सीए फायनल परीक्षा गट 1 च्या परीक्षा 2, 4 आणि 8 मे रोजी आणि गट 2 च्या परीक्षा 10, 14 आणि 16 मे रोजी होणार आहेत. 

आयसीएआय सीए पुर्व आणि फायनल परीक्षा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संस्थेने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार घेतल्या जातील. मार्चमध्ये, अर्ज फॉर्म दुरुस्ती विंडो पुन्हा उघडण्यात आली आणि संस्थेने उमेदवारांना त्यांची परीक्षा शहरे, गट आणि माध्यमे बदलण्याची परवानगी दिली. 

प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे

ICAI च्या अधिकृत वेबसाइट  icai.org किंवा icaiexam.icai.org ला भेट द्या. लाॅग इन आयडी आणि पासवर्ड टाका. पुढील विंडोवर, CA 2024 प्रवेशपत्रे तपासा आणि डाउनलोड करा. 

सीए प्रवेशपत्र 2024 डाउनलोड केल्यानंतर, उमेदवारांना त्यांची नावे, नोंदणी क्रमांक, छायाचित्रे, स्वाक्षरी, केंद्रे, माध्यम, गट इत्यादींची पडताळणी करावी लागेल.