मुंबई विद्यापीठाचा सावळा गोंधळ; इंजिनिअरिंगच्या ३ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे तब्बल ३ हजार विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाले.

मुंबई विद्यापीठाचा सावळा गोंधळ;  इंजिनिअरिंगच्या ३ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मागील काही वर्षापासून मुंबई विद्यापीठाचा (Mumbai University) अजब कारभार  पाहायला मिळत आहे. यामुळे विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील इंजिनिअरिंगच्या ३ हजार (3 thousand engineering students failed) विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्याचे झाले असे की, पहिल्या व दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम तीन-तीन महिन्यात संपवण्यात आला. वास्तविक यासाठी सहा-सहा महिन्यांचा कालावधी असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे तब्बल ३ हजार विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला (Educational loss) लागले आहे. 

सविस्तर वृत्त असे की, चार वर्षाच्या इंजिनिअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमाला पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात ११ विषय असतात. दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी यापैकी सहा विषय पास होणे बंधनकारक आहे. मात्र, पहिल्या वर्षात प्रवेश घेताना तो जुन-जुलै महिन्यात होणे अपेक्षित आहे. तसे न होता. ही प्रवेशप्रक्रिया नोव्हेंबर महिन्यात पार पडली. त्यामुळे दोन्ही सत्रांचा अभ्यासक्रम हा केवळ सहा महिन्यात पुर्ण करण्यात आला. त्याचा परिणाम असा झाला की, विद्यार्थ्यांना अभ्यास करायला वेळ कमी पडला आणि अनेक विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाले. 

विद्यापाठी कायद्यानुसार, विद्यापीठाने महिना दिड महिन्यात निकाल लावणे अपेक्षित असते. त्यासाठी साडे तीन महिन्यांचा वेळ घालण्यात आला. निकाल चांगले येतील या अपेक्षात असलेल्या विद्यार्थ्यांच्या विरोधात निकाल आले. त्यानंतर अनुउत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा केवळ चार दिवासांत घेण्यात आल्या. त्यामुळे या एटीकेटीचे प्रमाण वाढले. 

विद्यार्थ्यांना चार-पाच विषयांत एटीकेटी लागली. असे असताना पुढील वर्षाची संपुर्ण फिस घेवून त्यांचा तात्पुरत्या स्वरुपात प्रवेश निश्चित करण्यात आला. पहिल्या वर्षातील तीन पेक्षा अधिक विषय अनुउत्तीर्ण असताना दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्यात आले. नियमानुसार तसे प्रवेश देता येत नाही. त्यामुळे या ३ हजार विद्यार्थांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.