ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी

डॉ. मंगला नारळकीर यांनी गणितज्ज्ञ म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले.

ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी
Dr Mangala Naralikar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

ज्येष्ठ गणितज्ज्ञ, लेखिका डॉ. मंगला नारळीकर (Dr. Mangala Naralikar) यांचे सोमवारी पहाटे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. मागील काही वर्षांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. अखेर सोमवारी ८० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर (Dr. Jayant Naralikar) यांच्या त्या पत्नी होत. (Senior Mathematician Dr. Mangala Narlikar passed away)

डॉ. मंगला नारळकीर यांनी गणितज्ज्ञ म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले. प्रगत गणितावर काम करत त्यांनी मुलांना सोप्या भाषेत गणित समजावून सांगण्यासाठी विशेष प्रयत्न केले. बालभारतीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकांमध्येही असे बदल करण्याबाबत त्या आग्रही होत्या.

शाळेचा प्रताप : विद्यार्थ्याला चौथीत केलं नापास, शाळा सोडल्याच्या दाखल्यावरही उल्लेख

गणिताच्या सोप्या वाटा, नभात हसरे तारे, भेटलेली माणसं, पाहिलेले देश, भेटलेली माणसं अशा विविध पुस्तकांतून त्यांनी लेखिका म्हणून आपला ठसा उमटवला. मुंबई विद्यापीठातून १९६२ मध्ये बीए पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी १९६४ मध्ये गणित विषयातून एमए पदवी मिळवली.

त्यानंतर १९६४ ते १९६६ या काळात इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात आधी सहायक संशोधक आणि नंतर सहयोगी संशोधक म्हणून त्यांनी काम केले. १९६७ ते १९६९ मध्ये केंब्रिज विद्यापीठात पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या शाळेत त्यांनी गणिताचे अध्यापन केले. शालेय विद्यार्थ्यांना गणित सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठीही त्यांनी काही पुस्तके लिहिले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD