Big Breaking : बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ९१.२५ टक्के; यंदाही मुलींची बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

Big Breaking : बारावीचा निकाल जाहीर,  राज्याचा निकाल   ९१.२५ टक्के; यंदाही मुलींची बाजी
HSC Result Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Maharashtra HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education)  फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या  इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल (12th result declared) गुरुवारी जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलीच आघाडीवर असून मुलींचा निकाल ९३.७३ टक्के तर मुलांचा निकाल ८९.१४ टक्के लागला आहे. (HSC Result Updates)

राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला असून ९६.०१ मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१३ टक्के लागला आहे. निकालात पुणे विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत राज्यातील फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आली.

राज्यातून बारावीच्या परीक्षेस  १४ लाख २८  हजार १९४  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख १४ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा ४.५९ टक्क्यांनी अधिक आहे. एकूण १५४ विषयांपैकी २३ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांचा दुपारी दोन वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.

निकालाच्या अपडेट्ससाठी 'एज्युवार्ता'ला फॉलो करा.

परीक्षेचा निकाल खाली दिलेल्या लिंकवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे 


१. mahresult.nic.in 
२. https://hsc.mahresults.org.in 
३. http://hscresult.mkcl.org 
४. https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board 
५. https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th result-2023 
६. http://mh12.abpmajha.com 

  

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2