अंगणवाडी सेविकांनी गिरवले विद्यापीठात धडे 

बालकांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास या विषयावर या शिबिरात त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.  तसेच खेळ गाणी, गोष्टी यांतून नितीमुल्यांची ओळख व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिचय करून दिला.

 अंगणवाडी सेविकांनी गिरवले विद्यापीठात धडे 

 अंगणवाडी सेविकांनी गिरवले विद्यापीठात धडे 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बहि:शाल शिक्षण मंडळ व लोणावळा येथील ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष यांनी मनशक्ती प्रयोग केंद्राच्या साहाय्याने अंगणवाडी सेविकांसाठी महिला दिनानिमित्त एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

अंगणवाडी सेविकांचा संबंध विद्यार्थी पूर्व दशेतील ० ते ६ वयोगटातील बालकांशी येतो. या बालकांना संस्कारक्षम बनविण्याची जबाबदारी अंगणवाडी सेवकांची असते. ही जबादारी अधिक सक्षमतेने पार पाडता यावी यासाठी बालकांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास या विषयावर या शिबिरात त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.  तसेच खेळ गाणी, गोष्टी यांतून नितीमुल्यांची ओळख व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिचय करून दिला. मुलांच्या वर्तनात येणाऱ्या समस्यांवर पालकांचे देखील मार्गदर्शन करण्यासंबंधी प्रशिक्षण दिले गेले.

शिबिरात मनशक्ती प्रयोग केंद्राचे मार्गदर्शक प्रमोदभाई शिंदे, अजित फापाळे यांनी मार्गदर्शन केले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष विभागाचे मानद संचालक डॉ. हरिश नवले यांनी विभाग शिक्षण क्षेत्रात व ज्ञानविस्तारामध्ये समाजातील पायथा ते माथा काम करण्याचे विभागाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. समारोपाच्या भाषणात प्रा.डॉ.गीता शिंदे यांनी नवीन शैक्षणिक धोरणात अंगणवाडी शिक्षिकांचे महत्व सांगितले. 

----