सरकारच्या एनओसी अभावी रखडले बीएड प्रवेश; ५० हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

राज्य सामाईक प्रवेश  चाचणी कक्षाकडून बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड या अभ्यासक्रमांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते.

सरकारच्या एनओसी अभावी रखडले बीएड प्रवेश; ५० हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
BEd Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

उच्च शिक्षण विभागाकडून (Higher Education Department) बीएडसह (BEd Admission) इतर संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत राज्य शासनाकडे (Maharashtra Government) दोन महिन्यांपूर्वीच प्रस्ताव पाठवून अद्याप एनओसी मिळालेली नाही. त्यामुळे बीएड, एमएड व इतर अभ्यासक्रमांची प्रवेश अजूनही सुरूच झालेले नाहीत. केवळ विद्यार्थ्यांची ऑनलाईन सुरू असून प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.

राज्य सामाईक प्रवेश  चाचणी कक्षाकडून बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड या अभ्यासक्रमांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यासाठी जुलै महिन्यातच विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. आतापर्यंत ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी बीएडसाठी नोंदणी केली आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांची झाडाझडती; क्लासेसशी असणारी छुपी युती होणार उघड

नोंदणीची मुदत सातत्याने वाढविली जात आहे. दि. १६ ऑगस्ट रोजी नोंदणीसाठी अंतिम मुदत होती. ही मुदत २३ तारखेपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यासाठी एकच दिवस उरलेला असताना पुढील प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांममध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, याबाबत उच्च शिक्षण विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जवळपास ५०० बीएड महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांना  राज्य सरकारकडून दरवर्षी एनओसी दिली जाते.यंदा एनओसी देण्याबाबतचा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाने दोन महिन्यांपुर्वीच राज्य शासनाकडे सादर केला आहे. पण अजूनही त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. परिणामी, प्रवेशप्रक्रिया रखडली आहे.

बीएडसह इतर संबंधित अभ्यासक्रमांमध्ये होणारे प्रवेश वर्षागणिक कमी होत चालले आहेत. त्यातच दरवर्षीच प्रवेश प्रक्रिया रेंगाळत चालल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. विद्यार्थी इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. संबंधित अभ्यासक्रमांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे टाळले जाते. परिणामी, बीएडच्या प्रवेशावर परिणाम होत आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo