परदेशी विद्यापीठांच्या परवानगीचे स्वागत ; युके मधील खासदारांच्या शिष्टमंडळाची सिम्बायोसिसला भेट

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज इंडिया युके फोरम ऑफ पार्लमेंटच्या माध्यमातून नऊ खासदारांच्या शिष्टमंडळाने सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला भेट दिली.

परदेशी विद्यापीठांच्या परवानगीचे स्वागत ; युके मधील खासदारांच्या शिष्टमंडळाची सिम्बायोसिसला भेट

भारताने नवीन शैक्षणिक धोरण तयार केले असून त्यात परदेशी विद्यापीठांना भारतात येण्यास परवानगी देण्यात आली आहे. आम्ही अनेक वेळा ही परवानगी मिळावी, अशी मागणी करत होतो. अखेर हा मार्ग मोकळा झाला आहे.आम्ही भारताच्या या निर्णयाचे स्वागत करतो, असे प्रतिपादन ब्रिटनचे खासदार लॉर्ड करण बिलीमोरिया यांनी केले. 

      फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज इंडिया युके फोरम ऑफ पार्लमेंटच्या माध्यमातून नऊ खासदारांच्या शिष्टमंडळाने सिम्बायोसस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला भेट दिली.भारत व ब्रिटन या दोन देशांमध्ये व्यापार, हवामान, स्वच्छ ऊर्जा ,आरोग्य आणि सुरक्षा संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा दौरा होता. त्याचाच एक भाग म्हणून या शिष्टमंडळाने पुण्यात सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट दिली. यावेळी लॉर्ड करण बिलोमोरिया यांनी पत्रकारांची संवाद साधला.या शिष्टमंडळात बॅरोनेसा वर्मा, लॉर्ड कुलदीप सहोता, बॉब ब्लॅकमन, व्हिस्काउंट वेव्हरली, मार्टिन डे, ॲन्ड्यू रोसिंडेल, लॉर्ड राज पॉल लूम्बा, डेम निया यांचा समावेश होता. यावेळी सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शां.ब. मुजुमदार प्र-कलकुरू डॉ. विद्या येरवडेकर कुलगुरू डॉ.रजनी गुप्ते, डॉ राजीव येरवडेकर आदी उपस्थित होते.

         लॉर्ड करण बिलीमोरिया म्हणाले, भारतातून ब्रिटनमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. दुबईमध्ये इंग्लंड विद्यापीठ संकुल सुरू करण्यात आली आहे. तेथे विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारताने सुद्धा परदेशी विद्यापीठांना परवानगी दिल्यामुळे अनेक विद्यापीठांना आता भारतात येणे शक्य होईल.

" सिंबायोसिसने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनीसाठी पुण्यात शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता नवीन शैक्षणिक धोरणामुळे परदेशातील विद्यापीठांना भारतात शैक्षणिक संकुल उभारण्यास परवानगी मिळाली आहे. परंतु, जमीन खरेदी पासून संकुल उभारणीसाठीच्या अनेक परवानगी घेण्यापेक्षा परदेशी विद्यापीठांनी छोटी संकुले उभारावीत. सिम्बायोसिस सारख्या विद्यापीठांकडे सोई सुविधा पुरवण्याची क्षमता आहे."

- डॉ शां.ब.मुजुबदार , संस्थापक अध्यक्ष, सिंबायोसिस