शिक्षण खाते सेवक सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी संदीप जाधव यांची बिनविरोध निवड 

अध्यक्ष म्हणून संदीप जाधव, उपाध्यक्ष सुरेश शिंदे, सचिव नितीन क्षीरसागर, सहसचिव संदीप गवळी काही जणांंची संचालक पदी निवड करण्यात आली.

शिक्षण खाते सेवक सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी संदीप जाधव  यांची बिनविरोध निवड 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुणे शहर शिक्षण खाते सेवक सहकारी पतपेढी (मर्या.) (Pune City Education Account Sevak Sahakari Credit Bank) पुणेच्या अध्यक्षपडी  संदीप जाधव (Sandeep Jadhav) यांची तर सचिवपदी नितीन क्षीसागर (Nitin Kshirsagar) यांची बिनविरोध निवड (Uncontested choice) करण्यात आली आहे.निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्यातील उपनिबंधक अमर देशपांडे यांनी काम पाहिले. 

शालेय शिक्षण विभागाच्या पुणे शहरातील कार्यालयांच्या आस्थापनेवरील कर्मचा-यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे. संस्थेच्या घटना व नियमावलीनुसार आणि सहकार विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दर पाच वर्षानी निवडणूकीद्वारे १३ संचालकांची संस्थेच्या सभासदांमधून निवड केली जाते. पतसंस्थेची सन 2023-24 ते 2028-2029 या कालावधीसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालकांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाचे शासकीय कर्मचारी हे पतपेढीचे  सभासद असून वर्ग २, वर्ग १ चे राजपत्रित अधिकारी सुध्दा या पटपेठीचे सभासद आहेत.

पटपेढीने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे सभासदत्व स्विकारले आहे. आता पटपेढीचे अध्यक्ष म्हणून संदीप जाधव, उपाध्यक्ष म्हणून सुरेश शिंदे, तर सचिव म्हणून नितीन क्षीरसागर आणि  सहसचिवपदी  संदीप गवळी यांची निवड झाली आहे. तसेच संचालक मंडळात  महेश हिरळीकर, मयुर प्रधान,राजू जाधव,गणेश कोकणे
,अमोल पवार,नितीन वारे ,मोहन ईटे,रश्मी मांडळे ,उज्वला  पांचाळ यांची निवड करण्यात आली आहे.