RTE 2023 : प्रवेशासाठी आता शेवटची संधी; १५ मेनंतर मुदतवाढ नाही

सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले असून त्यासाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, ही मुदतवाढ शेवटची असेल, असे शिक्षण विभागाकडून (Education Department) स्पष्ट करण्यात आले आहे.

RTE 2023 : प्रवेशासाठी आता शेवटची संधी; १५ मेनंतर मुदतवाढ नाही
RTE 2023 Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षण हक्का कायद्याअंतर्गत (RTE 2023) २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेशासाठी (RTE Admission) निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अत्यंत धीम्यागतीने सुरू आहेत. एकूण निवड झालेल्या ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांपैकी (Students) मंगळवारपर्यंत केवळ ५४ हजार विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले आहेत. अजूनही सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले असून त्यासाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, ही मुदतवाढ शेवटची असेल, असे शिक्षण विभागाकडून (Education Department) स्पष्ट करण्यात आले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रीया संपुर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२३ २४ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडत (लॉटरी) पाच एप्रिल रोजी काढण्यात आली असून निवड यादीतील बालकांचे प्रवेश आठ मेपर्यंत घ्यायचे होते.

हेही वाचा : बारामतीच्या विद्यार्थिनीने अनुभवला होरपळणाऱ्या मणिपूरचा थरार..

२०२३ २४ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडतीद्वारे निवड झालेल्या निवड यादीतील बालकांच्या कागदपत्रांची तपासणी करुन प्रवेश निश्चित करण्यासाठी व बालकांच्या पालकांना प्रवेशासाठी १५ मेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी (Sharad Gosawi) यांनी दिली.

प्रलंबित असलेल्या प्रवेशाबाबतच्या तक्रारी व अपील अर्जाबाबत सुनावणी घेवून १५ मे पूर्वी निकाली काढण्यात यावीत, अशा सुचना गोसावी यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानंतर २०२३ २४ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडतीद्वारे निवड झालेल्या प्रतिक्षा यादीतील बालकांच्या प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे, असेही गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : धक्कादायक : दहावी, बारावी पासची प्रमाणपत्रे मिळतात ३५ ते ५० हजारांत

आरटीई प्रवेशाची सद्यस्थिती –

एकूण राखीव जागा – १ लाख १ हजार ८४६

एकूण अर्ज – ३ लाख ६४ हजार ४१३

प्रवेशासाठी निवड – ९४ हजार ७००

प्रवेश निश्चित (दि. ९ मेपर्यंत) – ५३ हजार ९३६

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2