वकिलीचे स्वप्न पाहाणाऱ्यांसाठी शेवटची संधी! एलएल बी ३ वर्ष सीईटी अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ

उमेदवार व पालकांच्या विनंतीचा मान ठेवून व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेवून एलएल बी ३ वर्ष प्रवेश पुर्व सीईटी परीक्षेचे अर्ज भरण्याच्या दिनांकास २४ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

वकिलीचे स्वप्न पाहाणाऱ्यांसाठी शेवटची संधी! एलएल बी ३ वर्ष सीईटी अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) एल. एल. बी. ३ वर्ष (LLB 3 years) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी (Pre-Entrance Examination) अर्ज भरण्याची पुन्हा मुदत वाढवण्यात आली आहे.  सीईटी सेलकडून यापूर्वी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. २१ फेब्रुवारी अर्ज नोंदणी करण्याची शेवटची तारिख होती, मात्र आता ती ३ दिवासांनी वाढवून २४ फेब्रुवारीपर्यंत (By extension 24 February) करण्यात आली आहे. त्यामुळे वकिल होण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या तरुणांसाठी अर्ज करण्याची ही शेवटची संधी आहे. यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे सीईची सेलकडून सांगण्यात आले आहे. 

मागील काही वर्षांपासून विधी अभ्यासक्रम निवडण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या नोंदणीच्या डाटाची तपासणी केली असता अनेक उमेदवारांचे अर्ज अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. तसेच उमेदवार व पालकांकडून सीईटी अर्ज भरण्याच्या दिनांकास मुदतवाढ मिळावी यासाठी विनंती कार्यालयास प्राप्त झाली. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करुन पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असल्याचे राज्य सामाईक परिषदेकडून परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. 

 याबाबतची सविस्तर माहिती सीईटी सेलच्या https://www.mahacet,org  या अधिकृत संकेतस्थळावर  उपलब्ध आहे. सदरील परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज कसा भरायचा, नोंदणी वेळापत्रक माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.