मुक्त विद्यापीठाची ऑनलाईन डिग्री प्रस्थापित करणार : डॉ.संजीव सोनवणे, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांची नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड झाली असून ते मंगळवारी दुपारी मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

मुक्त विद्यापीठाची ऑनलाईन डिग्री प्रस्थापित करणार : डॉ.संजीव सोनवणे, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (Yashwantrao Chavan Maharashtra Open University ) माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी पुढील काळात आवश्यक शैक्षणिक व प्रशासकीय बदल केले जातील.तसेच मुक्त विद्यापीठाची ऑनलाईन डिग्री प्रस्थापित (ycmou online degree) केली जाईल. विद्यापीठाच्या केंद्रांचे (YCMOU center) सक्षमीकरण करण्यासाठी व त्यांच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही केली करण्यात येईल,असे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे (new vice chancellor of yashwantrao chavan maharashtra open university Sanjeev Sonawane) यांनी सोमवारी 'एज्यूवार्ता' शी संवाद साधतांना सांगितले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांची नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड झाली आहे. या निमित्ताने विद्यापीठातर्फे मंगळवारी (दि.२३ ) सकाळी ११ वाजता डॉ. सोनवणे सोनवणे यांचा सेवागौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.त्यानंतर सोनवणे हे दुपारी मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी जाणार आहेत. 
      सोनवणे म्हणाले, शिक्षणाची आवड असणा-या पण काही कारणास्तव प्रत्यक्ष महाविद्यायात जाऊन शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसह आर्थिक दूर्बल विद्यार्थ्यांना सहजपणे दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हायला हवे. मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून राबाविल्या जाणा-या विविध अभ्यासक्रमामध्ये काल सुसंगत बदल केले जातील.तसेच क्रेडीटवर आधारित ऑनलाईन डिग्री प्रस्थापित केली जाईल.मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून काही जिल्ह्यात नाही तर राज्यभर काम करण्याची संधी आहे. त्यामुळे पुढील काळात राज्यातील विद्यार्थ्यांसाठी काम करता येईल. 

मुक्त विद्यापीठाचे केंद्र कसे असावे यांचे एक मॉडेल आणि हॅण्ड बुक तयार केले आहे.परंतु, त्यानुसार केंद्र असत नसल्याचे निदर्शनास येते.त्यामुळे याबाबत येत्या २९ मे रोजी याबाबत बैठक आयोजित केली आहे.सर्व केंद्रांकडून त्यांच्याकडे असणा-या गोष्टी व नसणा-या गोष्टींची माहिती ऑनलाईन फार्मद्वारे मागवली जाणार आहे.सर्व केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ व सोई-सुविधा असल्याचा पाहिजेत.त्यादृष्टीने पुढील काळात कार्यवाही केली जाईल.एखाद्या केंद्रांवर मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर आलेली  पुस्तके उतरवून मोजून घेण्यात अडचणी येतात,आशा प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींवर पुढील काळात काम केले जाईल,असेही सोनवणे यांनी सांगितले.  
-------------------