विद्यार्थ्यांसाठी पुण्यातून पहिला गुन्हा दाखल करून घेण्याची तयारी - अमित ठाकरे

विद्यार्थ्यांच्या मूलभूत व प्रलंबित प्रश्नासाठी विद्यापीठावर मोर्चा काढला जाणार आहे. मात्र, या मोर्चाचा इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, याची खबरदारी घेतली जाणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी पुण्यातून पहिला गुन्हा दाखल करून घेण्याची तयारी - अमित ठाकरे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी येत्या शुक्रवारी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला जाणार आहे.परंतु, इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या (12 th exam)पार्श्वभूमीवर हा मोर्चा शांततेच्या मार्गाने (March in the way of peace)काढला जाणार असला तरी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले नाही तर पुण्यातून पहिला गुन्हा (First crime from Pune)दाखल करून घेण्याची माझी तयारी आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी गुरुवारी पुण्यात स्पष्टच सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या चतुर्श्रुंगी मंदिर ते पुणे विद्यापीठ दरम्यान काढल्या जाणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. अमित ठाकरे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मूलभूत व प्रलंबित प्रश्नासाठी विद्यापीठावर मोर्चा काढला जाणार आहे. मात्र, या मोर्चाचा इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, याची खबरदारी घेतली जाणार आहे. दुपारी बाराच्यानंतर मोर्चाला सुरुवात केली जाईल. तसेच परीक्षा केंद्रात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी अत्यंत शांततेच्या मार्गाने हा मोर्चा काढला जाईल.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानंतर या पुढील काळात राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मोर्चे काढले जातील. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या आधिसभेच्या निवडणुकांमध्ये मनविसे पूर्ण ताकतीने उतरणार आहे,असे स्पष्ट करून अमित ठाकरे म्हणाले, विद्यापीठातील ललित कला केंद्रात घडलेल्या घटनेत दोषी असणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई झालीच पाहिजे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न गंभीर असून त्यांना साधे गुणवत्तापूर्ण जेवनही मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या जेवनात सातत्याने अळी सापडत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

वसतिगृहाची दुरावस्था झाली असून नाशिक येथील विद्यापीठाच्या उपकेंद्राचे काम अजूनही प्रलंबित आहे. मराठी भाषा भावनांचा प्रश्न अनेक वर्षांपासून सुटला नाही, यासह अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विद्यापीठाला अल्टीमेटम दिला जाणार आहे. दिलेल्या कालावधीत प्रश्न सुटले नाहीत तर पुण्यातून पहिला गुन्हा दाखल करून घेण्याची माझी तयारी आहे,असेही अमित ठाकरे यांनी  सांगितले.