राज्यातील सात विद्यार्थ्यांना पं. भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती जाहीर

भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत प्रोत्साहन ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विविध चार उपक्रम राबविले जातात.

राज्यातील सात विद्यार्थ्यांना पं. भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

राज्य सरकारच्या (Maharashtra Government) वतीने देण्यात येणाऱ्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्तीसाठी (Pandit Bhimsen Joshi Youth Scholarship) सात विद्यार्थ्यांची (Students) निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना दरमहा पाच हजार रुपये याप्रमाणे दोन वर्ष शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. राज्य सरकारकडून सध्या एक वर्षासाठी शिष्यवृत्तीला मंजूरी दिली आहे.

 

भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत प्रोत्साहन ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विविध चार उपक्रम राबविले जातात. त्यापैकी भारतरत्न पं. भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती योजना हा एक उपक्रम राबविला जातो. या उपक्रमांतर्गत शास्त्रीय संगीतामध्ये शिक्षण घेणाऱ्या हुशार व गरजू विद्यार्थ्यांना दरमहा पाच हजार रुपये याप्रमाणे  दोन वर्षांसाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.

...तर शाळा दत्तक योजना कागदावरच राहील !

 

२०२२-२३ या वर्षी सात विद्यार्थ्यांची या उपक्रमांतर्गत निवड करण्यात आली आहे. या सात विद्यार्थ्यांना सुरूवातीच्या एक वर्षाच्या कालावधीसाठीची शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या सुरूवातीच्या एका वर्षासाठी दरमहा पाच हजार रुपये याप्रमाणे चार लाख वीस हजार रुपये खर्चाला राज्य सरकारने मंजूर दिली आहे.

 

चैतन्य परब (शास्त्रीय संगीत), पवन झोडगे (पखवाज), पवन सिडाम (तबला), पार्थ भूमकर (पखवाज), जगमित्र लिंगाडे (तबला), सुर्यकांत शिंदे (पखवाज) आणि यश खडके (हार्मोनियम) या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.

 

अशा आहेत योजनेच्या अटी व शर्ती -

१. विद्यार्थ्यांचे वय कमाल २५ वर्षे इतक असावे.

२.विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

३. केंद्र शासनाची किंवा इतर संस्थेची शास्त्रीय संगीताच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळत असल्यास या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळणार नाही.

४. शासनाच्या तज्ज्ञ समितीमार्फत प्राप्त अर्जांची छाननी करून दरवर्षी १२ गरजू विद्यार्थ्यांची (६ गायन व ६ वादन क्षेत्रातील) शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येते.

५. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दरमहा पाच हजार रुपये याप्रमाणे दोन वर्षे शिष्यवृत्ती दिली जाते.

६. गुरुकडे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुकडे किमान १० वर्षे शिक्षण घेत असल्याचे गुरुचे शिफारसपत्र जोडावे लागते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j