रमणबागेत ऋषिपंचमी उत्साहात साजरी

गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार, ज्येष्ठ शिक्षक यशवंत लेले, अंटार्टिका खंडावर संशोधन करणारे सुहास काणे, व्हायोलिन वादक रमाकांत परांजपे, चित्रकार डॉ. मिलिंद फडके यांचे सपत्निक पूजन करण्यात आले. 

रमणबागेत ऋषिपंचमी उत्साहात साजरी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग (New English School Ramanabagh) शाळेत ऋषिपंचमीनिमित्त विविध क्षेत्रांतील ऋषितुल्य व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात आला. गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार, ज्येष्ठ शिक्षक यशवंत लेले, अंटार्टिका खंडावर संशोधन करणारे सुहास काणे, व्हायोलिन वादक रमाकांत परांजपे, चित्रकार डॉ. मिलिंद फडके (Dr. Milind Phadke) यांचे सपत्निक पूजन करण्यात आले. 

उज्ज्वल उद्यासाठी संस्कृतिचे स्मरण, इतिहासाचे मनन, राष्ट्रदर्शन, गुणग्रहण आणि सेवा योजन या पंचसूत्रीच्या आधारे विद्यार्थ्यांनी कष्ट घेण्याची तयारी करावी. असे विचार डॉ. दातार यांनी यावेळी व्यक्त केले. 

राज्यातील सात विद्यार्थ्यांना पं. भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती जाहीर

यावेळी प्रशालेत 'ब्रम्हांड गणेशा'ची स्थापना करण्यात आली आहे. चांद्रमोहीम आणि सूर्यमोहीम (आदित्य एल-वन) हा देखावा सादर करण्यात आला आहे.

मुख्याध्यापिका मनीषा मिनोचा, पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार, गणेशोत्सवाच्या कार्याध्यक्षा शुभांगी पाखरे, शारदा जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j