NMC : वैद्यकीय महाविद्यालयांमधील लैंगिक छळ प्रकरणांच्या चौकशीसाठी समित्या करण्याचे आदेश

आपल्या कर्मचार्‍यांवर लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यास NMC कडून सांगण्यात आले आहे. 

NMC : वैद्यकीय महाविद्यालयांमधील लैंगिक छळ प्रकरणांच्या चौकशीसाठी समित्या करण्याचे आदेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शैक्षणिक संस्था, कार्यालये या ठिकाणी वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या (Sexual Harassment) तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) वैद्यकीय महाविद्यालये (Medical College) आणि संस्थाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. NMC ने  देशातील सर्व वैद्यकीय शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांना  लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. या अंतर्गत त्यांनी आपल्या कर्मचार्‍यांवर लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यासही सांगण्यात आले आहे. 

NMC ने  देशातील सर्व वैद्यकीय संस्था आणि महाविद्यालयांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, " संस्थांकडे ICC (इंटर्नल कम्प्लेंट्स कमिटी ), LC (लोकल कमिटीज) आणि IC (इंटर्नल कमिटी ) ची रचना आणि  यासंबंधी आवश्यक माहिती असणे आवश्यक आहे. नियुक्त केलेल्या व्यक्तींचे ई-मेल आयडी, संपर्क क्रमांक, ऑनलाइन तक्रारी नोंदवण्याची प्रक्रिया, नियम आणि अंतर्गत धोरणे इत्यादींसंबंधी आवश्यक माहिती संस्था किंवा संस्थेच्या वेबसाइटवर सहज उपलब्ध करून द्यावी लागेल, जी वेळोवेळी  अपडेट करणे आवश्यक आहे."

Medical Admission : पहिल्या टप्प्यात केवळ एमबीबीएस, बीडीएसचेच प्रवेश...नोंदणीसाठी उरले काही तास, 'आयुष'साठी पाहा वाट

सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याची विनंती करण्यात आली आहे. सर्व आरोग्य संस्था/वैद्यकीय महाविद्यालयांना वैद्यकीय महाविद्यालये/संस्थांनी ICCS/ ची स्थापना केली आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम  हाती घ्यावेत, असेही NMC ने म्हटले आहे.

 LCS/ICs या समित्यांची स्थापना, त्या समित्यांची रचना POSH कायद्याच्या तरतुदींनुसार काटेकोरपणे असावी, असेही नमूद केले आहे. NMC ने  आपल्या पत्रात कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) कायदा, २०१३ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा उल्लेख देखील  केला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD