अखेर ‘फार्मसी’ची प्रवेश प्रक्रिया सुरू; सीईटी सेलकडून सविस्तर वेळापत्रक जाहीर

एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांत अभियांत्रिकीसह इतर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या. पण फार्मसी आणि आर्किटेक्चरची प्रक्रिया सुरू झाली नव्हती.

अखेर ‘फार्मसी’ची प्रवेश प्रक्रिया सुरू; सीईटी सेलकडून सविस्तर वेळापत्रक जाहीर
B Pharmacy Admission 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यार्थी व पालक मागील अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या औषधनिर्माणशास्त्र पदवी (B Pharmacy) व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला (Centralised Admission Process) मुहूर्त मिळाला आहे. सीईटी सेलकडून (CET Cell) या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात केली आहे. मंगळवारी रात्री सेलकडून अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिध्द केले. त्यानुसार विद्यार्थ्यांना २० जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. दरम्यान, इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेत फार्मसीसाठी नोंदणी करण्याचा कालावधी खूप कमी देण्यात आला आहे. (The admission process of B Pharmacy begins, schedule announced by CET Cell)

एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांत अभियांत्रिकीसह इतर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या. पण फार्मसी आणि आर्किटेक्चरची प्रक्रिया सुरू झाली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. विलंब होत असल्याने विविध तर्कवितर्क लढविले जात होते. विद्यार्थ्यांकडून ही प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी होत होती. अखेर सेलकडून फार्मसीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

AIMA MAT 2023 : बिझनेस स्कूल्समध्ये प्रवेशासाठी परीक्षा, असा भरा अर्ज

सीईटी सेलने प्रसिध्द केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना २० जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. तर २१ तारखेपर्यंत कागदपत्रांनी पडताळणी करून घ्यावी लागेल. २० तारखेनंतर नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅप फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही, असे सेलकडून स्प्ट करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांचा बिगर कॅप जागांवर प्रवेसासाठी विचार केला जाईल.

सीईटी सेलकडून तीन फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणीवेळी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिक मागास प्रवर्ग आदी मूळ कागदपत्रे नसल्यास संबंधित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याबाबतची पावती द्यावी लागणार आहे. अन्यथा या विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश दिले जातील, असे सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Diploma Admission : फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंटचे प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

प्रवेश प्रक्रियेविषयी माहितीसाठी - https://ph2023.mahacet.org/StaticPages/HomePage

फार्मसी प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक -

ऑनलाईन नोंदणी व कागदपत्रे अपलोड – २० जुलै

कागदपत्रांची पडताळणी – २१ जुलै

तात्पुरती गुणवत्ता यादी – २३ जुलै

हरकती नोंदविणे – २४ ते २६ जुलै

अंतिम गुणवत्ता यादी - २८ जुलै

पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविणे – २९ ते ३१ जुलै

तात्पुरती निवड यादी – २ ऑगस्ट

ऑनलाईन महाविद्यालय निश्चित करणे किंवा नाकारणे – ३ ते ५ ऑगस्ट

महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चिती – ३ ते ५ ऑगस्ट

 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD