ऑनलाईन व दुरस्थ अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेताय..मग ही काळजी घ्या! युजीसीने केले सतर्क

आयोगाने देशभरातील विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांना ऑनलाईन माध्यमासह मुक्त व दुरस्थ पध्दतीने विविध अभ्यासक्रमांना परवानगी दिली जाते.

ऑनलाईन व दुरस्थ अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेताय..मग ही काळजी घ्या! युजीसीने केले सतर्क

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) ऑनलाईन, मुक्त व दुरस्थ अभ्यासक्रमांमध्ये (Open and Distance Learning) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना (Students) सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांना मान्यता आहे किंवा नाही, याची खातरजमा करूनच पुढील प्रक्रिया करावी, असे आयोगाने म्हटले आहे. तसेच १७ अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन किंवा मुक्त व दुरस्थ पध्दतीने प्रवेशास मनाई असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

आयोगाने देशभरातील विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांना ऑनलाईन माध्यमासह मुक्त व दुरस्थ पध्दतीने विविध अभ्यासक्रमांना परवानगी दिली जाते. पण अनेक संस्थांना मान्यता नसताना त्यांच्याकडून असे अभ्यासक्रम चालविले जातात. विद्यार्थ्यांकडून कसलीही खातरजमा न करता अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतला जातो. त्यामुळे त्यांची फसवणूक होते. अशा तक्रार सातत्याने येत असतात. या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे आयोगाने विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक प्रवेश घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.

NEET PG चे कटऑफ आणले शुन्यावर; आरोग्य मंत्रालयाने दिली मोठी अपडेट

 

युजीसीने म्हटले आहे की, उच्च शिक्षण संस्थांना मुक्त व दुरस्थ अभ्यासक्रम व ऑनलाईन अभ्यासक्रमांसाठी मान्यता आहे का, हे विद्यार्थ्यांनी तपासावे. युजीसीसह संबंधित संस्थेच्या संकेतस्थळावर त्याची माहिती पाहावी. याबाबतची माहिती युजीसीच्या http://deb.ugc.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांचीही माहितीही या संकेतस्थळावर असल्याची  माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.

 

महाराष्ट्रातील नरसी मोनजी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेमध्ये जुलै-ऑगस्ट २०२३ आणि जानेवारी-फेब्रुवारी २०२४ या शैक्षणिक सत्रांसाठी मुक्त व दुरस्थ तसेच ऑनलाईन अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशास मान्यता देण्यात आलेली नाही. तसेच आंध्र प्रदेश व तमिळनाडूतील प्रत्येकी एका विद्यापीठामध्येही प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे.

 

या अभ्यासक्रमांमध्ये ऑनलाईन, दुरस्थ प्रवेशाला मनाई

अभियांत्रिकी, वैद्यकीय, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि इतर पॅरा मेडिकल अभ्यासक्रम, औषधनिर्माणशास्त्र, नर्सिंग, दंतवैद्यक, वास्तुकला, विधी, कृषी, उद्यानविद्या, हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी, कलिनरी सायन्स, एअरक्राफ्ट मेंटनन्स, व्हिज्युअल आर्ट्स अॅन्ड स्पोर्ट्स, अॅव्हिएशन. या अभ्यासक्रमांव्यतिरिक्त पीएचडी व एमफील हे अभ्यासक्रमही ऑनलाईन किंवा मुक्त व दुरस्थ पध्दतीने घेण्यास मनाई असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j