NEP अंमलबजावण्यामुळे विद्यार्थ्यांचा 'MBA' प्रवेशाकडील कल वाढला 

एआयसीटीई मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रम सुध्दा लवकरच येण्याची अंतर्गत राबविले जाणार आहेत. त्यात कोणते बदल होतील याबाबत विद्यार्थ्यांना कल्पना नाही. त्यामुळे तत्पूर्वीच एमबीए करून घ्यावे,असा विचार एमबीए प्रवेशास पात्र विद्यार्थी करत आहेत.

NEP अंमलबजावण्यामुळे विद्यार्थ्यांचा 'MBA' प्रवेशाकडील कल वाढला 
MBA admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) अंमलबजावणी सुरू झाली असून महाराष्ट्रात पारंपरिक अभ्यासक्रम 'एनईपी'नुसार शिकवण्यास सुरूवात झाली आहे. सध्या पारंपरिक अभ्यासक्रम एनईपी अंतर्गत राबवले जात असले तरी लवकरच व्यावसायिक अभ्यासक्रमही (Vocational Courses )अशाच पध्दतीने राबवण्याच्या सूचना येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनईपी अंमलबजावणीपूर्वी 'एमबीए' (MBA) अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
    सीईटी सेलच्या माध्यमातून अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून विद्यार्थ्यांना २८ जून १४ जुलै या कालावधीपर्यंत अर्ज भरण्यास मदत देण्यात आले आहे. आतापर्यंत एमबीए अभ्यासक्रमासाठी ५ हजार ४२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यातील ३० हजार ८४० विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज कन्फर्म केले आहेत. प्रवेश अर्ज करण्यास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. पुढील काही दिवसात त्यात आणखी वाढ होणार आहे.
     राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात पुढाकार घेतला आहे. कला, वाणिज्य, विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमासाठी एनईपीनुसार अभ्यासक्रम तयार करून थ्री इयर व फोर इयर डिग्री प्रोग्राम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावर्षी स्वायत्त महाविद्यालयांत व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालवणाऱ्या महाविद्यालयांमध्ये एनईपी अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे. एआयसीटीई मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रम सुध्दा लवकरच येण्याची अंतर्गत राबविले जाणार आहेत. त्यात कोणते बदल होतील याबाबत विद्यार्थ्यांना कल्पना नाही. त्यामुळे तत्पूर्वीच एमबीए करून घ्यावे, असा विचार एमबीए प्रवेशास पात्र विद्यार्थी करत आहेत.


''' एनईपी अंमलबजावणीनंतर सर्वच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात बदल होणार असल्याने तत्पूर्वीच एमबीए पदवी पूर्ण करण्याचा विद्यार्थ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे यावर्षी सुद्धा सर्व नामांकित व शहरातील प्रमुख महाविद्यालयांमधील एमबीए प्रवेशाच्या जागांवर पूर्ण प्रवेश झाल्याचे दिसून येईल. विद्यार्थ्यांना सुद्धा रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील."

  - डॉ.पराग काळकर,अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे