SSC Result Update : दहावीच्या निकालाचा चार वर्षांचा नीचांक; ही आहेत कारणे

राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीचा निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यापासून अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहण्याची उपलब्ध करून देण्यात आला आहे.

SSC Result Update : दहावीच्या निकालाचा चार वर्षांचा नीचांक; ही आहेत कारणे
SSC Board Result Update

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (SSC Board) शुक्रवारी इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल (10th Result) जाहीर करण्यात आला. राज्याच्या निकालात यंदा मागील वर्षीच्या तुलनेत ३.११ टक्क्यांनी घट झाली आहे. यावर्षीचा निकाल ९३.८३ टक्के एवढा आहे. चार वर्षांतील निकालाचा हा नीचांक आहे. बारावीच्या निकालापाठोपाठ (HSC Result) दहावीच्या निकालातही घट झाल्याचे दिसते. (Maharashtra SSC Board Result Update)

राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी दहावीचा निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यापासून अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहण्याची उपलब्ध करून देण्यात आला आहे. यंदाच्या निकालावर कोरोनाचे (Covid 19) सावट दिसून आले आहे. बारावीचा निकालही यंदा कमी लागला आहे. कोरोनामुळेच दोन्ही निकालांवर परिणाम झाल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

SSC Result : दहावीच्या निकालात पुन्हा लातूर पॅटर्न; १०९ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

२०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी बहुतेक विषयांच्या परीक्षा झाल्या होत्या. तर २०२१ मध्ये परीक्षाच घेण्यात आली नाही. विद्यार्थ्यांना अंतर्गत परीक्षांवरूनच गुण देण्यात आले. तर २०२२ मध्ये सुरळीतपणे परीक्षा पार पडली. मात्र, यावेळी अभ्यासक्रम कमी करण्यात आला होता.

कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम झाला. त्यांची लेखन क्षमतेवर परिणाम झाले. यंदाच्या परीक्षेसाठी संपूर्ण अभ्यासक्रम होता. सलग तीन वर्ष कोरोनाचा परिणाम जाणवला. याचा एकत्रित परिणाम निकालावर झाल्याचे दिसत असल्याची माहिती गोसावी यांनी दिली. त्याचप्रमाणे मंडळाकडून यंदा राज्यभर गैरमार्गाशी लढा ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यात आल्याचेही गोसावी यांनी स्पष्ट केले.  

SSC Result Update : इयत्ता दहावीचा निकाल जाहीर; निकालात तीन टक्क्यांची घसरण, पाहा आणखी ठळक वैशिष्ट्ये...

निकाल घसरण्याची ठळक कारणे –

  • कोरोना काळात दोन वर्ष अध्ययनात खंड
  • अध्ययन क्षमता, लेखन क्षमता कमी झाली
  • दोन वर्ष अभ्यासक्रम कमी
  • यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा
  • पेपर लेखनासाठीचा वाढीव अर्धा तास कमी केला
  • गैरमार्गाशी लढा मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी

निकालाच्या महत्वाच्या अपडेट्ससाठी पहा व्हिडिओ : https://www.youtube.com/shorts/A0WX77jfcac

चार वर्षांचा दहावीचा निकाल (टक्केवारी) –

२०२० – ९५.३०

२०२१ – ९९.९५

२०२२ – ९६.९४

२०२३ – ९३.८३

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo