दहशतवादी कृत्यासाठी वापरल्या गेलेली ब्ल्यू बेल्स शाळेची आणखी एक धक्कादायक माहिती समोर    

 शाळेकडे उपलब्ध असणारे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांचे मान्यता प्रमाणपत्र बोगस आहे. पत्रावरील आहिरे यांची स्वाक्षरी बनावट असल्याची खातरजमा केली आहे. आता राज्य शासनाचे मान्यता प्रमाणपत्र खरे आहे की खोटे याबाबतची माहिती तपासावी लागणार आहे.

दहशतवादी कृत्यासाठी वापरल्या गेलेली ब्ल्यू  बेल्स शाळेची आणखी एक धक्कादायक माहिती समोर    

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क                  

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) कारवाईमध्ये ब्ल्यू बेल्स शाळेचे (Blue Bells School) दोन मजले दहशतवादी कृत्यासाठी वापरले जात असल्याचे नुकतेच समोर आले. त्यामुळे शिक्षण क्षेत्र चांगलेच हादरून गेले. परंतु, आता त्याहून धक्कादायक माहिती समोर आली असून ब्ल्यू  बेल्स ही स्वयम अर्थसाहित शाळा (self finance School) अनधिकृतपणे चालवली जात असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या शाळेवर गुन्हा दाखल केला जाणार आहे,असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे ( DYD Audumbar Ukirde) यांनी सांगितले.      

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/               

   ब्ल्यू बेल्स शाळा दहशतवादी कृत्यासाठी वापरली जात असल्याचे समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने अधिकाऱ्यांचा  गट शाळेची चौकशी करण्यासाठी पाठवला आहे. परंतु, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केलेल्या चौकशीतच या शाळेकडे बोगस मान्यता प्रमाणपत्र असल्याचे आढळून आले. तत्कालीन शिक्षण उपसंचालक आहिरे यांच्या स्वाक्षरीचे पत्र या शाळेकडे आहे. परंतु या पत्राचा आवक जावक क्रमांक शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे उपलब्ध नाही. तसेच या शाळाकडे असणाऱ्या मान्यता पत्रावरील आहिरे यांची स्वाक्षरी बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे.          

          उकिरडे म्हणाले, ब्ल्यू बेल्स ही  स्वयंम अर्थसाहित शाळा असून २०१९ मध्ये ही शाळा सुरू झाली. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग शाळेत सुरू आहेत. या  शाळेकडे उपलब्ध असणारे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांचे मान्यता प्रमाणपत्र बोगस आहे. पत्रावरील आहिरे यांची स्वाक्षरी बनावट असल्याची खातरजमा केली आहे. आता राज्य शासनाचे मान्यता प्रमाणपत्र खरे आहे की खोटे याबाबतची माहिती तपासावी लागणार आहे. शाळेकडे बोगस मान्यता प्रमाणपत्र असल्याचा अहवाल राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना सादर करण्यात आला आहे.