SSC-HSC Board Exam : इयत्ता दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेचा अर्ज भरला का?

इयत्ता दहावीसाठी नियमित अर्जाची मुदत संपली असून आता ही मुदत दि. ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. विलंब शुल्कासह दि. १ ते ८ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येतील.

SSC-HSC Board Exam : इयत्ता दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेचा अर्ज भरला का?
SSC-HSC Board Exam

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (SSC-HSC Board) मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी (SSC-HSC Exam) ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याअंतर्गत नियमित शुल्कानुसार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी (दि. २०) संपली. त्यामुळे मंडळाकडून इयत्ता दहावीचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून इयत्ता बारावीसाठी विलंब शुल्कासह अर्ज भरण्याच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. (Maharashtra Board Exam)

 

मार्च २०२४ परीक्षेस नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन, आयटीआयचे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सादर करता येत आहेत. त्यानुसार नियमित शुल्कासह दि. २० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती.

न्यायालयाच्या आदेशानंतरही आरटीई शुल्क परतावा नाही; शिक्षण विभाग येणार अडचणीत?

 

इयत्ता दहावीसाठी नियमित अर्जाची मुदत संपली असून आता ही मुदत दि. ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. विलंब शुल्कासह दि. १ ते ८ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येतील. इयत्ता बारावीसाठी विलंब शुल्कासह दि. २१ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहेत. अर्जाचे शुल्क भरल्याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO