डार्विनचा सिध्दांत पाठ्यपुस्तकातून हद्दपार

कोरोना काळात विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा खूप ताण होता. आता हा ताण कमी करण्यासाठी अभ्यासक्रमातील काही भाग वगळला असल्याचे परिषदेकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.

डार्विनचा सिध्दांत पाठ्यपुस्तकातून हद्दपार
Darwins theory of revolution

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (NCERT) अभ्यासक्रमांमधील अनेक महत्वाचे मुद्दे वगळले आहेत. त्यामध्ये आता महान शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विनच्या (Charles Darwin) उत्क्रांती सिध्दांताचीही (Theory of Evolution) भर पडल्याने शिक्षक, शास्त्रज्ञ संताप व्यक्त करू लागले आहेत. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना हा सिध्दांत शिकविला जाणार नाही. यापूर्वी मुघल काळातील काही भाग तसेच महात्मा गांधींची हत्येचा काही भाग वगळण्यात आला आहे. (Darwin's Evolution Theory)

देशातील एक हजार ८०० हून अधिक शिक्षक, विज्ञान विषयातील तज्ज्ञ, शास्त्रज्ञांनी NCERTच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. या सर्वांनी मिळून परिषदेला खुले पत्र लिहिले आहे. ब्रेकथ्रू सायन्स सोसायटीने याबाबत पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यासारख्या संस्थांमधील तज्ज्ञांची स्वाक्षरी त्यावर आहे.

हेही वाचा : स्पर्धा परिक्षांच्या क्लासेसचा किळसवाणा बाजार! महेश झगडेंना विश्वासच बसला नाही...

एनसीईआरटीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा खूप ताण होता. आता हा ताण कमी करण्यासाठी अभ्यासक्रमातील काही भाग वगळला असल्याचे परिषदेकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. ओझे कमी करण्यासाठी अभ्यासक्रमाला आणखी तर्कशुद्ध करण्याचा प्रयत्न केल्याचे परिषदेचे म्हणणे आहे.

परिषदेने केलेल्या बदलानुसार विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात 'आनुवंशिकता आणि उत्क्रांती' ची जागा 'आनुवंशिकता' ने घेतली आहे. हा बदल केवळ एका शैक्षणिक सत्रासाठी असेल, असे शिक्षकांना वाटत होते. परंतु आता ते कायमचे अभ्यासक्रमातून वगळण्यात आले आहे. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत अभ्यासक्रमातून काढणे म्हणजे 'शिक्षणाची थट्टा' असल्याची नाराजी शिक्षक, शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या ज्ञानापासून वंचित ठेवून कोणते ज्ञान देणार आहोत, असा सवालही त्यांनी पत्रातून केला आहे.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. https://eduvarta.com/

उत्क्रांती सिध्दांत काय सांगतो?

एखाद्या विशिष्ट प्रजातीच्या अनेक प्रजातींच्या वनस्पती पूर्वी सारख्याच होत्या, परंतु भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांची रचना बदलली. एका प्रजातीच्या अनेक प्रजाती तयार झाल्या. वनस्पतींप्रमाणेच प्राण्यांच्या बाबतीतही असेच आहे. मानवाचे पूर्वज एकेकाळी माकडे होती. हळूहळू गरजांनुसार माकडांचा विकास होत गेला. तो माणूस झाला. वातावरण आणि परिस्थितीनुसार हळूहळू बदल होणे आणि जीवांच्या नवीन प्रजातींची उत्पत्ती होणे, याला उत्क्रांती म्हटले जाते.