Hotel Management : एनटीएकडून JEE २०२४ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

NCHM JEE २०२४ राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) द्वारे आयोजित केले जाईल. परीक्षेत बसण्यासाठी नोंदणी १ फेब्रुवारी २०२४ रोजी NTA द्वारे सुरू केली जाईल.

Hotel Management : एनटीएकडून JEE २०२४ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
NCHM JEE 2024

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

पुढील वर्षी हॉटेल मॅनेजमेंट (Hotel Management) अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी. नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट (NCHM) ने २०२४-२५ या वर्षात हॉटेल मॅनेजमेंट संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेचे (JEE) वेळापत्रक जारी केले आहे. कौन्सिलने जारी केलेल्या अधिकृत माहिती नुसार मे २०२४ मध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. 

 

NCHM JEE २०२४ राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) द्वारे आयोजित केले जाईल. परीक्षेत बसण्यासाठी नोंदणी १ फेब्रुवारी २०२४ रोजी NTA द्वारे सुरू केली जाईल. विद्यार्थी या परीक्षेसाठी nchmjee.nta.nic.in या पोर्टलवर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन लिंकद्वारे अर्ज करू शकतील.उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून १ हजार  रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल.

विद्युत विभागात अडीच हजार जागांवर भरती; पदे, अर्ज कसा भरायचा...संपूर्ण माहिती वाचा...

 

संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे मे महिन्यातच जारी केली जातील. दुसरीकडे परीक्षा झाल्यानंतर मे महिन्यातच उत्तरसुचीही जाहीर होणार आहेत. उमेदवार या उत्तरसुचींवर त्यांचे आक्षेप ऑनलाइन नोंदवू शकतील. या हरकतींचा आढावा घेऊन परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. यशस्वी घोषित उमेदवारांची  प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जून २०२४ मध्ये समुपदेशनाची पहिली फेरी घेतली जाईल. 

 

NCHM JEE परीक्षेच्या माध्यमातून देशातील प्रतिष्ठित हॉटेल मॅनेजमेंट संस्था तसेच विविध राज्यांतील सरकारी आणि खाजगी हॉटेल व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाईल. या संस्थांमध्ये एकूण ११ हजार ९६५ जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO