SPPU News : टाईम्स रँकिंग सुधारले तरी संशोधनात आणखी पिछाडीवर

भारतातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत पुणे विद्यापीठ देशात १८ व्या क्रमांकावर आहे. एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये पुणे विद्यापीठ २०० च्या आत आले असून १९० व्या स्थानी आहे.

SPPU News : टाईम्स रँकिंग सुधारले तरी संशोधनात आणखी पिछाडीवर
SPPU Research

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Times Higher Education Ranking 2023 : टाइम्स हायर एज्युकेशन युनिव्हर्सिटी रँकिंग (World University Ranking) मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) रँकिंगमध्ये चांगली सुधारणा झाली. त्यामुळे विद्यापीठासाठी ही आनंदाची बाब असली तरी संशोधनामध्ये झालेली घसरण चिंता वाढविणारी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत संशोधनात विद्यापीठाला कमी गुण मिळाले आहेत. संशोधन स्तरावर विद्यापीठाला मोठा पल्ला गाठावा लागणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

लंडनच्या टाइम्स हायर एज्युकेशनने (THE) 2023 साठी वार्षिक क्रमवारी जाहीर केली आहे. मागील वर्षी टाईम्स रँकिंग पुणे विद्यापीठ ८०१ ते १००० च्या दरम्यान होते. यंदा विद्यापीठ ६०१ ते ८०० च्या दरम्यान आले आहे. तर भारतातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत पुणे विद्यापीठ देशात १८ व्या क्रमांकावर आहे. एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग (Asia University Ranking 2023) मध्ये पुणे विद्यापीठ २०० च्या आत आले असून १९० व्या स्थानी आहे. मागील वर्षी ते २०१ ते २५० मध्ये होते.

गुड न्यूज : टाईम्स रँकिंगमध्ये पुणे विद्यापीठाची जोरदार मुसंडी, एशिया रँकिंगमध्ये प्रथमच २०० च्या आत

टाईम्स रँकिंगमध्ये विद्यापीठाने प्रगती केली असली तरी संशोधनात प्रभाव पाडू शकले नाही. मागील वर्षी वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये विद्यापीठाला २६.२ गुण मिळाले होते. यंदा विद्यापीठाला २३.५ टक्के गुण मिळाले आहेत. अध्यापन, सायटेशन, इंडस्ट्री इन्कम आणि इंटरनॅशनल आऊटलुकमध्ये विद्यापीठाने प्रगती केल्याचे दिसते.

एशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्येही हीच स्थिती आहे. अध्यापन, सायटेशन, इंडस्ट्री इन्कम आणि इंटरनॅशनल आऊटलुकमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत विद्यापीठाने चांगली कामगिरी केली आहे. तर संशोधनात ३२.५ वरून विद्यापीठ २९.१ गुणांपर्यंत खाली घसरले आहे. संशोधनामध्ये विद्यापीठाची कामगिरी सुधारल्यास विद्यापीठाचे रँकिंगवर सुधारू शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.   

‘या’ खासगी विद्यापीठांच्या शुल्कात मिळेल ५० टक्के सवलत; पुण्यात सर्वाधिक, पाहा संपूर्ण यादी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कामगिरी

वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग (मिळालेले गुण)

                 २०२२   २०२३

अध्यापन      ३५     ४०.६

संशोधन       २६.२   २३.५

सायटेशन      ३२.८   ४६

इंडस्ट्री इन्कम  ३६.२   ३८.७

इंटरनॅशनल     १६.४   २२.२

आउटलुक     

एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग (मिळालेले गुण)

                  २०२२   २०२३

अध्यापन      ४१.५   ४८

संशोधन       ३२.५   २९.१

सायटेशन      ३२.८   ४६

इंडस्ट्री इन्कम  ३६.२   ३८.७

इंटरनॅशनल     १६.४   २२

आउटलुक     

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo