दहावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार

ssc board ,10th exam ,paper

दहावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रत्येक विषयाला संकेतांक क्रमांक दिला जातो. विषयाचा संकेतांक 15 व इंग्रजीचा संकेत अंक 17 असल्याने या संकेतांकांनुसार विषयांचाक्रम निश्चित केलेला आहे. हिंदी व इंग्रजी विषयाच्या पेपरचा क्रम चुकलेला नाही. सर्व परीक्षा राज्य मंडळाचे प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी गोंधळून जाऊ नये.
    राज्य मंडळातर्फे विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र अर्थात हॉल तिकीट देण्यात आले आहेत इयत्ता दहावी बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी हॉल तिकिटावर दिलेल्या सूचनांचे पालन करावे परीक्षेच्या दिवशी पहिल्या व द्वितीय सत्रात कोणत्या वेळी उपस्थित व्हावे याबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रथम सत्रात सकाळी साडेदहा वाजता तर दुपारच्या सत्रात अडीच वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे मात्र प्रत्यक्षात पेपर सकाळी अकरा व दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे, असे परिपत्रक राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्ध केले आहे.