तलाठी पदाच्या भरातीचा मुहूर्त सापडला; अखेर जाहीरात प्रसिद्ध 

तलाठी या पदाच्या ४ हजार ६४४ जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.मात्र, एकाच जिल्ह्यासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी अर्ज करता येणार नाही. एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज सादर केल्यास,असे अर्ज अपात्र ठरविले जाणार आहेत,

 तलाठी पदाच्या भरातीचा मुहूर्त सापडला; अखेर जाहीरात प्रसिद्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

     राज्याच्या महसूल विभागातर्फे अखेर तलाठी या पदाच्या ४ हजार ६४४ जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांकडून २६ जून ते १७ जुलै या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तसेच उमेदवारांना केवळ एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी अर्ज करता येणार नाही. एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज सादर केल्यास,असे अर्ज अपात्र ठरविले जाणार आहेत, असे महसूल विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत नमूद केले आहे. 
     स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या जागांसह तलाठी पदाची भरती प्रक्रिया केव्हा सुरू होते.  याबाबतच्या प्रतीक्षेत होती. अखेर सरळ सेवेने भरती केल्या जाणाऱ्या तलाठी या पदाच्या ४  हजार ६४४  जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात झाली. मराठी, इंग्रजी ,सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी /  अंकगणित यावर प्रत्येकी २५ प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी असेल. ही परीक्षा दोन तास घेतली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व कालावधी  https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल, असे जाहिरातीत स्पष्ट करण्यात आले आहे. आरक्षण व इतर बाबींसंदर्भातील सविस्तर माहिती जाहिरातीत देण्यात आली आहे.