गुड न्यूज : टाईम्स रँकिंगमध्ये पुणे विद्यापीठाची जोरदार मुसंडी, एशिया रँकिंगमध्ये प्रथमच २०० च्या आत

मागील वर्षी टाईम्स रँकिंग  ८०१ ते १००० च्या दरम्यान होते. त्याचाप्रमाणे एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये पुणे विद्यापीठ २०० च्या आत आले असून १९० व्या स्थानी आहे.

गुड न्यूज : टाईम्स रँकिंगमध्ये पुणे विद्यापीठाची जोरदार मुसंडी, एशिया रँकिंगमध्ये प्रथमच २०० च्या आत
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Times Higher Education Ranking 2023 : टाइम्स हायर एज्युकेशन युनिव्हर्सिटी रँकिंग (World University Ranking) २०२३ जाहीर झाले असून त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) रँकिंगमध्ये वाढ झाली असल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे. भारतातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत पुणे विद्यापीठ देशात १८ व्या क्रमांकावर आहे. तर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये पुणे विद्यापीठ ६०१ ते ८०० च्या दरम्यान आले आहे.

लंडनच्या टाइम्स हायर एज्युकेशनने (THE) 2023 साठी वार्षिक क्रमवारी जाहीर केली आहे. मागील वर्षी टाईम्स रँकिंग पुणे विद्यापीठ ८०१ ते १००० च्या दरम्यान होते. त्याचाप्रमाणे एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग (Asia University Ranking 2023) मध्ये पुणे विद्यापीठ २०० च्या आत आले असून १९० व्या स्थानी आहे. मागील वर्षी ते २०१ ते २५० मध्ये होते. नॅशनल युनिव्हर्सिटी रँकिंग फ्रेमवर्क मध्ये विद्यापीठाचा क्रमांक घसरल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. मात्र, टाइम्स हायर एज्युकेशन युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये विद्यापीठाची कामगिरी सुधारली आहे.

‘या’ खासगी विद्यापीठांच्या शुल्कात मिळेल ५० टक्के सवलत; पुण्यात सर्वाधिक, पाहा संपूर्ण यादी

दरम्यान, एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये पहिल्या २०० मध्ये भारतातील १८ विद्यापीठांनी जागा पटकावली आहे तर पहिल्या ५० मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (IISc) बेंगळुरू ४८व्या क्रमांकावर आहे. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १९० क्रमांक पटकावला आहे. देशातील प्रतिष्ठित समजल्या जाणारे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) या यादीतून बाहेर पडले आहे.

मागील वर्षी जेएनयू या यादीत १६७ व्या क्रमांकावर होते. ही यादी तयार करताना३१ देशांतील ६६९ विद्यापीठांचा विचार केला गेला आहे. ही यादी तयार करताना अध्यापन, संशोधन, ज्ञान हस्तांतरण आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन या मापदंडावर संस्थांचे परीक्षण करण्यात आले आहे.

SPPU News : पदवी प्रदान समारंभ १ जुलैला; सव्वा लाख विद्यार्थ्यांना मिळणार प्रमाणपत्र

ही आहेत देशातील १८ विद्यापीठे 

१ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, बेंगळुरू (IISc) : ४८
२. जेएसएस अकादमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च : ६८
३. शूलिनी युनिव्हर्सिटी ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड मॅन : ७७
४. महात्मा गांधी विद्यापीठ : ९५
५. आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था, हैदराबाद : १०६
६. अलगप्पा विद्यापीठ : १११
७. सविता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेस : ११३
८ जामिया मिलिया इस्लामिया : १२८
९ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रोपर : १३१ 
 १०. इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी दिल्ली : १३७
११ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंदूर : १४२
१२ थापर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग : १४५
१३ KIIT विद्यापीठ : १४७
१४ बनारस हिंदू विद्यापीठ : १५५
१५ ग्राफिक युग विद्यापीठ : १५९
१६ दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठ : १७०
१७. कलासलिंगम अॅकॅडमिक ऑफ रिसर्च अँड एज्युकेशन : १८३
१८. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : १९०

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo