‘या’ खासगी विद्यापीठांच्या शुल्कात मिळेल ५० टक्के सवलत; पुण्यात सर्वाधिक, पाहा संपूर्ण यादी

खासगी विद्यापीठांमधील विविध अभ्यासक्रमांचे शुल्क भरमसाठ असते. त्यामुळे गुणवत्ता असूनही अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक स्थितीमुळे प्रवेश घेता येत नाही.

‘या’ खासगी विद्यापीठांच्या शुल्कात मिळेल ५० टक्के सवलत; पुण्यात सर्वाधिक, पाहा संपूर्ण यादी
Private Universities in Maharashtra

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील खासगी म्हणजेच स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये (Self Financed Universities) प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात (Education Fee)  ५० ट्कके सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार राज्यात अशी २५ विद्यापीठे असून त्यातील १४ विद्यापीठे पुण्यात तर पाच मुंबईत आहेत. (Maharashtra Government) 

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने (Higher and Technical education department) याबाबतच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. खासगी विद्यापीठांमधील विविध अभ्यासक्रमांचे शुल्क भरमसाठ असते. त्यामुळे गुणवत्ता असूनही अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक स्थितीमुळे प्रवेश घेता येत नाही. त्यामुळे शासनाच्या निर्णयामुळे अशा विद्यार्थ्यांना खासगी विद्यापीठांमध्ये शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

केंद्र सरकार करणार युवकांचे कौशल्य ‘मॅपिंग’; जी-२० मध्ये पंतप्रधान मोदींचे मार्गदर्शन

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, राज्यात २५ खासगी विद्यापीठे आहेत. त्यामुळे या सर्व विद्यापीठांना शासनाचा निर्णय लागू होणार आहे. त्यापैकी पुण्यात सर्वाधिक १४ विद्यापीठे आहेत. त्यामध्ये अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठासह डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, एमआयटी आर्ट, डिझाईन अन्ड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, सिम्बायोसिस स्कील्स अन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, विश्वकर्मा विद्यापीठ आदी नामांकित विद्यापीठांचा समावेश आहे. पुण्याव्यतिरिक्त राज्यात मुंबईत पाच, कोल्हापूरमध्ये दोन तर नाशिक, रायगड, औरंगाबाद आणि अमरावतीमध्ये प्रत्येकी एक विद्यापीठ आहे.

या विद्यार्थ्यांना मिळेल प्रवेश

प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्येच्या एकूण १० टक्के इतक्या विद्यार्थ्यांसाठी, जे शासनाच्या निकषानुसार आर्थिक दुर्बल आहेत, अशा विद्यार्थ्यांना जात प्रवर्ग विचारात न घेता गुणवत्तेनुसार शैक्षणिक शुल्कामध्ये ५० टक्के सूट संबंधित स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठाकडून देण्यात येईल. याव्यतिरिक्त आर्थिक दुर्बल किंवा अन्य निकषांच्या आधारे उर्वरित विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कातून सूट द्यावयाची असल्यास त्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यापीठाच्या स्तरावर घेण्यात येईल, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील खासगी विद्यापीठे (यूजीसीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार) –

१. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे

२. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, मुंबई

३. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, पुणे

४. डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, कोल्हापूर

५. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे

६. डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठ, पुणे

७. डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे

८. फ्लेम विद्यापीठ, पुणे

९. जी. एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावती

१०. जे. एस. पी. एम. विद्यापीठ, पुणे

११. एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद

१२. एमआयटी आर्ट, डिझाईन अन्ड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे

१३. पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे

१४. संदीप विद्यापीठ, नाशिक

१५. संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर

१६. सोमय्या विद्याविहार विद्यापीठ, मुंबई

१७. स्पायसर अडव्हेन्टिस्ट युनिव्हर्सिटी, पुणे

१८. श्री बालाजी विद्यापीठ, पुणे

१९. सिम्बायोसिस स्कील्स अन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे

२०. विजयभूमी विद्यापीठ, रायगड

२१. विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे

२२. एनआयसीएमएआर युनिव्हर्सिटी, पुणे

२३. हैद्राबाद (एसआयएनडी) नॅशनल कॉलिजिएट युनिव्हर्सिटी, मुंबई

२४. अमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई

२५. अटलास स्कीलटेक युनिव्हर्सिटी, मुंबई

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo