विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी : प्रवेश रद्द केल्यास संपूर्ण शुल्क परत मिळणार, युजीसीचा निर्णय

देशभरातून विद्यार्थी आणि पालकांकडून आयोगाच्या विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश मागे घेतल्यास शुल्क परतावा न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी : प्रवेश रद्द केल्यास संपूर्ण शुल्क परत मिळणार, युजीसीचा निर्णय
UGC Fee Refund Guidelines

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

UGC Fee Refund Guidelines : देशभरातील विद्यापीठे (Universities in India) आणि महाविद्यालयांमध्ये सध्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. या पार्श्ववभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) शुल्क परताव्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. UGC ने जारी केलेल्या 'फी रिफंड पॉलिसी २०२३-२४' नुसार प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क परत (Fee Refund) देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश रद्द करण्याची मुदत देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना शुल्क परत करण्यासंदर्भात UGC ने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. देशभरातून विद्यार्थी आणि पालकांकडून आयोगाच्या विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश मागे घेतल्यास शुल्क परतावा न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत २७ जून २०२३ रोजी झालेल्या आयोगाच्या  बैठकीत शुल्क परताव्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वांवर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात आला.

UGC ने बदलले विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीचे नियम; ‘पीएचडी’वर फुली

शुल्क परताव्या संदर्भात UGC च्या नवीन नियमानुसार, जे विद्यार्थी ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश रद्द करतील, त्यांना संबंधित संस्थेने संपूर्ण शुल्क परत द्यावे लागणार आहे. तर जे विद्यार्थी ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश रद्द करतील, त्यांच्या शुल्कातून केवळ एक हजार रुपये महाविद्यालयाला कापून घेता येतील.

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाने प्रवेशासाठी निश्चित केलेल्या अंतिम तारखेच्या १५ किंवा त्याहून अधिक दिवसाआधी प्रवेश मागे घेतल्यास, महाविद्यालयाला संपूर्ण शुल्क परत करावे लागेल. तसेच अंतिम मुदत संपण्यास १५ दिवसांचा अवधी शिल्लक असल्यास विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेल्या एकूण शुल्काच्या ९० टक्के रक्कम परत मिळेल आणि १५ दिवसांहून कमी कालावधी असल्यास एकूण शुल्काच्या ८० टक्के रक्कम परत मिळेल.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा श्रेयांक आराखडा प्रसिध्द; यंदापासूनच होणार अंमलबजावणी

प्रवेशाची अंतिम तारीख उलटून १५ किंवा त्याहून अधिक दिवस झाले असतील तर विद्यार्थ्याला शुल्काच्या ५० टक्के रक्कम परत मिळू शकेल. आणि जर प्रवेशाची अंतिम तारीख उलटून ३० किंवा त्यापेक्षा अधिक दिवस झाले असतील तर त्या विद्यार्थ्याला त्याच्या शुल्काचा परतावा मिळणार नाही, असे UGC ने स्पष्ट केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD