11th Admission : तीन फेऱ्यांनंतरही ६० टक्के जागा रिक्त, मुंबई-पुणे आघाडीवर

शिक्षण विभागाकडून इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये मुंबईत सर्वाधिक १ लाख ४४ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत.

11th Admission : तीन फेऱ्यांनंतरही ६० टक्के जागा रिक्त, मुंबई-पुणे आघाडीवर
11th Admission Process

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यात पुण्यासह (Pune) पिंपरी चिचंवड, मुंबई (Mimbai), नागपूर, नाशिक व नागपूर या महापालिका कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी (11th Admission) ऑनलाईन केंदीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, त्यानंतरही तब्बल ६० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त (Vacancy) असल्याचे समोर आले आहे. विशेष फेऱ्यांमधून (Special Round) काही प्रमाणात प्रवेश झाले तरी हे प्रमाण नियमित फेऱ्यांच्या कमीच असते. त्यामुळे यंदाही ३० ते ४० टक्के जागा रिकाम्या राहण्याची भीती महाविद्यालयांना आहे.

शिक्षण विभागाकडून (Education Department) इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये मुंबईत सर्वाधिक १ लाख ४४ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत. तर पुण्यात ४४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. नागपूरमध्ये २० हजार ६००, नाशिक १२ हजार ३०० आणि अमरावतीत ७ हजार १६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

11th Admission : आजपासून विशेष फेरी, या गोष्टीकडे करू नका दुर्लक्ष!

पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये झालेल्या प्रवेशाच्या तुलनेत रिक्त जागांचा आकडा मोठा आहे. पुण्यात एकूण १ लाख १५ हजार जागा असून तीन फेऱ्यांनंतर त्यापेकी जवळपास ७१ हजार म्हणजे ६० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहेत. हीच स्थिती मुंबईचीही आहे. मुंबईत ३ लाख ८४ हजारा जागांपैकी २ लाख ४० हजार जागा रिक्त आहेत. नागपूरमध्ये ३३ हजारांहून जागा रिक्त राहिल्या आहेत. नाशिक व अमरावतीमध्ये जवळपास ५५ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत.

प्रामुख्याने कला शाखेच्या जागा अधिक रिक्त राहत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सर्व फेऱ्यांनंतर ३०.४९ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. कला शाखेमध्ये ५६ टक्के जागा भरल्या होत्या. तर विज्ञान व वाणिज्य शाखेच्या प्रत्येकी ७२ टक्केच जागांवर प्रवेश झाले होते. सर्वाधिक जागा अल्पसंख्याक कोट्यातील रिक्त राहिल्या होत्या. तसेच व्यवस्थापन व इन हाऊस कोट्यातील जागाही जवळपास ५० टक्के रिक्त होत्या.

शाळेचा प्रताप : विद्यार्थ्याला चौथीत केलं नापास, शाळा सोडल्याच्या दाखल्यावरही उल्लेख

सोमवारपासून प्रवेशाची पहिली विशेष फेरी सुरू झाली आहे. आता या विशेष फेऱ्यांमध्ये किती प्रवेश होणार, याबाबत शिक्षण विभागासह महाविद्यालयांनाही उत्सुकता आहे. एटीकेटी पात्र विद्यार्थी तसेच पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे त्यामध्येही काही जागांवर प्रवेश होतात. पण असे असले तरी रिक्त जागांच्या तुलनेत हा टक्का कमी असल्याने जेमतेम २० ते २५ टक्के रिक्त जागांवरच प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD