MBA Admission : सीईटी सेलकडून प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, ७ जुलैपर्यंत भरा अर्ज

ऑनलाइन पद्धतीने प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्जाची निश्चिती करण्याची प्रक्रिया ८ जुलै रोजी संपेल.

MBA Admission : सीईटी सेलकडून प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, ७ जुलैपर्यंत भरा अर्ज
MBA Admission 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

MAH-MBA/MMS-CET 2023 : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलने (CET Cell) MBA/MMS अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना दि. ७ जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. या मुदतीनंतर नोंदणी आणि पडताळणी केलेल्या विद्यार्थ्यांचा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत (Centralised Admission Process) समावेश होणार नाही. पसंतीक्रम भरणे व पुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक काही दिवसांत प्रसिध्द केले जाणार असल्याचे सेलकडून स्पष्ट करण्यात आले.

ऑनलाइन पद्धतीने प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्जाची निश्चिती करण्याची प्रक्रिया ८ जुलै रोजी संपेल. सात जुलैनंतर नोंदणी व पडताळणी झालेल्या अर्जांचा विचार नॉन कॅप जागांसाठी केला जाईल. MAH-MBA/MMS-CET 2023 साठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्रवेशासाठी नोंदणीसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

ITI आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! शिकत असतानाच उद्योग समूहांमध्ये घ्या प्रशिक्षण

इतर उमेदवार ज्यांनी CAT, CMAT, XAT, ATMA, MAT, GMAT मध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवेशासाठी वैध असलेले गुण प्राप्त केले आहेत आणि MAH-MBA/MMS-CET 2023 साठी नोंदणी केलेली नाही त्यांना कौन्सलिंग रजिस्ट्रेशन साठी शुल्क भरणे आवश्यक आहे, अशी माहिती सेलने दिली आहे.

नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळ www.mba2023.mahacet.org.in

अशी करा नोंदणी

* mba2023.mahacet.org.in येथे MAHA-CET च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

* 'न्यू रजिस्ट्रेशन'  लिंकवर क्लिक करा.

* स्वतःची नोंदणी करा आणि सबमिट वर क्लिक करा.

* अकाऊंटमध्ये लॉग इन करा आणि अर्ज भरा.

* नोंदणी पूर्ण झाल्यावर सबमिट वर क्लिक करा.

* शुल्क  भरा आणि सबमिट वर क्लिक करा.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2