पुणे विद्यापीठ 'ऑनस्क्रीन' पेपर तपासणार ; निकाल लवकर लागणार

ऑनस्क्रीन उत्तरपत्रिका तपासल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळालेले  गुण आपोआप जनरेट होतात. विविध विषयात मिळालेल्या गुणांची प्रोसेसिंग होऊन संबंधित विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तयार होते.

पुणे विद्यापीठ 'ऑनस्क्रीन' पेपर तपासणार ; निकाल लवकर लागणार

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने savitribai phule pune university आता सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे 'ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशन' onscreen evaluation करण्याचा निर्णय घेतला असून येत्या परीक्षेपासूनच या पद्धतीने उत्तरपत्रिका answer sheet तपासण्यास सुरुवात केली जाणार आहे. प्रथमतः विद्यापीठातील विभागांमधील व संलग्न महाविद्यालयातील affiliated university colleges पदवीत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका p g student answer sheet तपासल्या जाणार आहेत. येत्या आठवड्याभरात ऑनस्क्रीन मूल्यमापना  Onscreen assessment संदर्भातील निविदा प्रसिद्ध केले जाणार आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे vice chancellor of Pune University dr. karbhari kale यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.        

 पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे ,अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामधील महाविद्यालयांची संख्या आणि त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. तब्बल सात लाख विद्यार्थी विद्यापीठांतर्गत शिक्षण घेतात. सर्व विद्यार्थ्यांची नियोजित कालावधीत परीक्षा घेऊन निकाल जाहीर करण्यात काही वेळा विलंब होतो. त्यामुळे विद्यापीठाने आता ऑनस्क्रीन मूल्यमापन करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे.

                                   

 डॉ.कारभारी काळे म्हणाले, ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशन ही काळाची गरज झाली आहे. महाराष्ट्रातील काही विद्यापीठांमध्ये या पद्धतीने उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेतून मॉडरेटर व शिक्षकांना ऑनलाईन लॉगिन आयडी मिळतो. त्यातून ऑनस्क्रीन मूल्यमापनासाठी उत्तरपत्रिका दिल्या जातात. ऑनस्क्रीन उत्तरपत्रिका तपासल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळालेले  गुण आपोआप जनरेट होतात. विविध विषयात मिळालेल्या गुणांची प्रोसेसिंग होऊन संबंधित विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तयार होते. त्यामुळे केवळ गुणपत्रिका छापण्याचे काम उरते.      

 विद्यापीठाची संलग्न महाविद्यालयांमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका प्रथमतः ऑन स्क्रीन पद्धतीने तपासल्या जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरू केले जाईल, असे नमूद करून डॉ.कारभारी काळे म्हणाले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठासह राज्यातील इतर काही विद्यापीठांमध्ये या पद्धतीने उत्तरपत्रिका तपासण्याचे काम केले जात आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिकांचा भार हलका झाल्यामुळे परीक्षा विभाग पदवी अभ्यासक्रमाचा निकाल लवकर जाहीर करू शकेल. त्यामुळे येत्या १ ऑगस्टपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करणे शक्य होईल.