RTE Admission : ‘आरटीई’चे प्रवेश अजूनही सुरूच; ८२ हजारांहून अधिक प्रवेश निश्चित

खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव असलेल्या १ लाख १ हजार ८४७ जागांसाठी शिक्षण विभागाकडून लॉटरी पध्दतीने प्रवेश दिले जात आहे.

RTE Admission : ‘आरटीई’चे प्रवेश अजूनही सुरूच; ८२ हजारांहून अधिक प्रवेश निश्चित
RTE Admission 2023 Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE Admission) राज्यातील शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. राज्यात (Maharashtra) प्रवेशासाठी जवळपास १ लाख २ हजार जागा उपलब्ध असून आतापर्यंत सुमारे ८२ हजार ५०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे. तर अजूनही १९ हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. (School Education Department)

राज्यात आरटीईअंतर्गत ८ हजार ८२४ शाळांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव असलेल्या १ लाख १ हजार ८४७ जागांसाठी शिक्षण विभागाकडून लॉटरी पध्दतीने प्रवेश दिले जात आहे. त्यासाठी सुमारे ३ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. ऑनलाईन लॉटरीद्वारे ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांची पहिली निवड यादी प्रसिध्द करण्यात आली.

PMC Schools : आमदार माधुरी मिसाळ यांनी शाळांच्या दुरावस्थेचे विधानसभेत काढले वाभाडे

निवड झालेल्या ६३ हजार ९३३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. त्यानंतर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. आतापर्यंत ८२ हजार ४५७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून सध्या चौथ्या प्रतिक्षा यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. सध्या १९ हजार ३९० जागा रिक्त असून या जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना संधी दिली जात आहे.

दरम्यान, राज्यात सर्वाधिक १४ हजार ५२ प्रवेश पुणे जिल्ह्यात झाले आहेत. तर त्याखालोखाल ९ हजार २३ ठाण्यात, ५ हजार ७०६ प्रवेश नागपूरमध्ये, ४ हजार ४८४ प्रवेश मुंबईत आणि ४ हजार ८४ प्रवेश नाशिक जिल्ह्यात झाले आहेत. आरटीई प्रवेशाच्या सर्वाधिक जागाही राज्यात पुणे जिल्ह्यात आहेत. 

आरटीई प्रवेशाची स्थिती -

एकूण शाळा – ८ हजार ८२४

प्रवेश क्षमता – १ लाख १ हजार ८४७

एकूण अर्ज – ३ लाख ६४ हजार ४१३

निवड झालेले विद्यार्थी – ९४ हजार ७००

प्रतिक्षा यादीतील विद्यार्थी – ८१ हजार १२९

पहिल्या नियमित फेरीतील प्रवेश – ६३ हजार ९३३

पहिल्या प्रतिक्षा यादीतील प्रवेश – १३ हजार ६६०

दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील प्रवेश – ३ हजार ५८३

तिसऱ्या प्रतिक्षा यादीतील प्रवेश – १ हजार २५९

चौथ्या प्रतिक्षा यादीतील प्रवेश (दि. ७ ऑगस्ट स. ११ पर्यंत) - २२

एकूण प्रवेश निश्चित – ८२ हजार ४५७

रिक्त जागा – १९ हजार ३९०

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD