शासन स्वायत्त महाविद्यालय, विद्यापीठांना अनुदान देणार 

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्राधान्याने प्राध्यापक भरती आणि  महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत शासन कार्यवाही करीत आहे.

शासन स्वायत्त महाविद्यालय, विद्यापीठांना अनुदान देणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील स्वायत्त महाविद्यालय (autonomous colleges)आणि विद्यापीठांच्या प्राध्यापक भरती आणि अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची माहिती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil )यांनी विधान परिषदेत दिली.  

विधान परिषद सदस्य जयंत आसगावकर यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्राधान्याने प्राध्यापक भरती आणि  महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत शासन कार्यवाही करीत आहे. सन २००१ पूर्वी स्थापना झालेल्या ८९ शिक्षणशास्त्र (बी.एड.) महाविद्यालय, २००१ च्या पूर्वीची सर्वसाधारण कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेची ७८ महाविद्यालये , आदिवासी भागातील महाविद्यालये, नक्षलग्रस्त भागातील महाविद्यालये , अल्पसंख्याक महाविद्यालये , डोंगरी भागातील विद्यालये , अशा सात ते आठ वर्गवारीतून अनुदानाचा, प्राध्यापक भरतीचा विषय पूर्ण करीत आहोत. या सर्व कामासाठी ९००  कोटी रूपयांचा वित्तीय भार पडत आहे. या सर्व प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असल्याचे पाटील यांनी सांगितले.