CISCE Result : इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

CISCE ISC २०२३ बोर्ड परीक्षेत  एक किंवा दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुरवणी परीक्षेला बसले होते.

CISCE Result : इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर
ISC Results 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) ने इंडियन स्कूल सर्टिफिकेट ISC च्या १२ वी च्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.  बोर्डाने सुधारणेसाठी निकालही जाहीर केला आहे. उमेदवार CISCE, cisce.org आणि results.cisce.org या वेबसाईट वर आपला निकाल पाहू शकतात. 

CISCE ISC २०२३ बोर्ड परीक्षेत  एक किंवा दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुरवणी परीक्षेला बसले होते तर जे विद्यार्थी १२ वी परीक्षेत मिळालेल्या  गुणांवर समाधानी नव्हते असे विद्यार्थी  सुधार परीक्षेला बसले होते.

CISCE बोर्डाकडून सांगण्यात आले आहे की, ज्या यशस्वी विद्यार्थ्यांचा एकूण निकाल "पास सर्टिफिकेट नॉट अवॉर्ड" (PCNA) वरून "पास सर्टिफिकेट अवॉर्डेड" (PCA) मध्ये बदलला आहे त्यांना त्यांचे मागील मूळ गुणांचे विवरण सादर करावे लागेल. त्यानंतर बोर्ड गुणांचे सुधारित विवरणपत्र आणि उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र संबंधित विद्यार्थ्याच्या शाळेला सादर करेल.

असा पाहावा निकाल 

* अधिकृत वेबसाइट, results.cisce.org ला भेट द्या.

* कोर्स, UID आणि इंडेक्स नंबर टाका.

* क्लिक टू शो रिझल्ट वर क्लिक करा.

* ISC कंपार्टमेंट किंवा सुधारणा निकाल प्रदर्शित केला जाईल.

* निकाल तपासा आणि प्रिंट काढा

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD